घरमनोरंजनPoonam Pandey Death : मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन

Poonam Pandey Death : मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करत माहिती देण्यात आली. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

पूनम मांडेच्या टीमने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

- Advertisement -

पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायची. कोरोनाकाळात तिने बोल्ड अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघ जिंकला तर विवस्त्र
होण्याची घोषणा करुन तिने खळबळ उडवून दिली होती.

- Advertisement -

पूनमने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘द जर्नी ऑफ कर्मा’ आणि ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’ अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -