घरमहाराष्ट्रपुणेMaratha Reservation : आता मुदतवाढ नाहीच, कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण

Maratha Reservation : आता मुदतवाढ नाहीच, कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण

Subscribe

पुणे – मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. आज, शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी ही मुदत संपते आहे. आता पुन्हा या सर्वेक्षणाला मुदतवाढ मिळणार नसल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Commission) स्पष्ट केले आहे.

हे सर्वेक्षण शुक्रवारअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे. तसेच यापुढे मुदतवाढ मागू नये अशा सूचना आयोगाने सर्व जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाला (Maratha Survey) मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sahitya Sammelan : 72 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन अमळनेरात; आजपासून सुरुवात

मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार २३ ते ३१ जानेवारी या काळात राज्यभरात मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले. मात्र, या सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲपमध्ये सुरुवातीला काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. यामुळे सर्वेक्षणात अडथळे निर्माण झाले. परिणामी, सर्वेक्षणाचा वेग सुरुवातीला अत्यंत संथ होता. त्यातच राज्यातील अनेक गावे तसेच नगरपालिका असलेल्या मोठ्या शहरांची नावे ॲपमध्ये समाविष्ट न झाल्याने येथे सर्वेक्षण सुरूच झाले नाही. अशा अनेक कारणांमुळे हे सर्वेक्षण रखडले. या तांत्रिक समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना दिल्यानंतर सर्वेक्षणाला वेग आला.

- Advertisement -

हेही वाचा – Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही”

गोखले इन्स्टिट्यूटने तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर सर्वेक्षणला जरी जोमात सुरू झाले तरी, सर्वेक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाची आठ दिवसांची मुदत आणखी दोन दिवस वाढवून दिली. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश आयोगाकडून देण्यात आले.  मात्र, त्यातही अनेक ठिकाणी हे सर्वेक्षण वादात सापडले. काही ठिकाणी खासगी कर्मचाऱ्यांना कामाला लावले, काही ठिकाणी विद्यार्थी सर्वेक्षणासाठी फिरत होते, अशा अनेक गोष्टी या सर्वेक्षणादरम्यान घडल्या. त्यातही, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली अशा मोठ्या महापालिकांमध्ये सर्वेक्षणाचे काम ७५ ते ८० टक्केच झाले आहे. त्यामुळे या महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षणासाठी आणखी दोन दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारतर्फे या संदर्भात गुरुवारी सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला.

ॲप रात्री होणार बंद

सर्वेक्षण कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने आता सर्व संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. यामुळेच सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेले ॲप रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंतच सुरू राहणार असून त्यानंतर हे ॲप बंद करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -