घरक्रीडाअ‍ॅथलेटिक्सप्रेमींची ‘दोहा’वर नजर !

अ‍ॅथलेटिक्सप्रेमींची ‘दोहा’वर नजर !

Subscribe

आफ्रिकी अ‍ॅथलिट्सनी आशियातील ‘दोहा’ गाजवलं !

आफ्रिका खंडातील दर्जेदार अ‍ॅथलिट्सची पळवापळवी करणार्‍या बहारिनने ११ सुवर्ण जिंकत, पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावून तगड्या चीनला दुसर्‍या क्रमांकावर ढकललं. खरं तर ही यावेळच्या आशियाई स्पर्धा शर्यतींमधील ब्रेकिंग न्यूज ठरली. २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या ९ दिवसांच्या कालावधीत दोहामधील त्याच खलिफा स्टेडियममध्ये जागतिक स्पर्धा भरणार आहे. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्सप्रेमींना लवकरच जागतिक दर्जाची कामगिरी बघायची मेजवानी मिळणार आहे. अ‍ॅथलेटिक्सप्रेमीसुद्धा पुन्हा एकवार ‘दोहा’ वर नजर ठेऊन असतील.

“….. लोक नवर्‍याला सांगत की, अर्ध्या चड्डीत धावताना मांड्यांचं प्रदर्शन करण्यापेक्षा कमलजीतनं आता स्वयंपाकघर नको का सांभाळायला?” हे उदगार आहेत १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमधे भाग घेणार्‍या पहिल्या महिला अ‍ॅथलिट कमलजीत संधू यांचे! आणि ‘…. मी गावाकडची असल्याने लोक वडिलांना काही-बाही बोलत. मुलीला बघावं तेव्हा पळवीत असता. ती अशी पळून काय होणार?’ असं सांगणारी संजीवनी म्हणते, ‘गावात पळत असल्याने मला पूर्ण कपड्यात पाळायला लागायचं.’

- Advertisement -

१९७२ ते २०१९ अशी तब्बल ४७ वर्षं भारतीय महिला अ‍ॅथलिट लहानाच्या मोठ्या होत अनेक संकटांना तोंड देत, देशाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करीत असताना समाजाच्या टीकेला, समाजाच्या दबावाला बळी पडत आहेत. आजही पारंपरिक, बुरसटलेली मतं न बदलणार्‍या समाजात राहून, अ‍ॅथलेटिक्समधे प्रगती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाव न घेता सांगायचं तर, गेल्या ४-५ वर्षात, किती महिला अ‍ॅथलिट थोडंफार यश मिळाल्यावर संसारात रमून गेल्या ते पाहिलं की भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील गुंता लक्षात येतो, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांच्या अनेकजणीदेखील अनेक अडथळ्यांवर मात केली. हे पाहून भारतीय महिला अ‍ॅथलिट्सबद्दल सहानुभूती वाटूनसुद्धा जागतिक पातळीवरील त्यांची कामगिरी तटस्थ वृत्तीनेच बघावी लागेल. त्याच न्यायाने पुरुष अ‍ॅथलिट्सच्या कामगिरीकडेदेखील पाहावे लागेल. तसं करण्याचा आपण साधा प्रयत्न जरी केला तरी पहिल्याच प्रयत्नात आपली अँथलेटिक्समधील प्रगती किती तकलादू आहे ते समजून येतं (कोष्टक पहा.)

आशियाई स्पर्धाशर्यतींनंतर लगेच पाच महिन्यात पुन्हा, दोहा येथील त्याच खलिफा स्टेडियमवर जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती भरणार असल्याने आणि त्यानंतर अवघ्या १० महिन्यातच ऑलिम्पिकमध्ये धावायचं असल्याने सारे आशियाई अ‍ॅथलिट, जरा दमाने, आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या प्रगतीचा पत्ता लागू न देता, दुखापतींची सबब पुढे करीत, सराव करण्यावर भर देत आहेत. भारताच्या गोमती मारीमुथू (८०० मीटर्स), पी. यु. चित्रा(१५०० मीटर्स), आणि तेजिंदर तूर (गोळाफेक)या तिघा भारतीयांनी, दुखापतग्रस्त अ‍ॅथलिट्सच्या अनुपस्थितीत, अनपेक्षितरित्या सुवर्ण पटकावून, भारताची लाज राखली.

- Advertisement -

तरीसुद्धा गेल्यावेळेच्या आशियाई स्पर्धाशर्यतींपेक्षा भारताला तब्बल ९ सुवर्ण कमी मिळाली. एकूण पदकसंख्यादेखील जवळजवळ निम्याने घटली. सर्व तगडे अ‍ॅथलिट दोहा येथील स्पर्धाशर्यतींमध्ये उतरले नसले तरी तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढती होऊन १२ स्पर्धाविक्रम नोंदवले गेले. युसेफ करम (कुवेत-४०० मीटर्स), याने ४०० मीटर्स धावताना राष्ट्रीय विक्रम करीत ४४.८४ सेकंदांची थरारक वेळ दिली. यजमान कतारच्या अबूबकर हैदर अब्दुल्लाने तर कमाल केली. त्याने ८०० मीटर्स धावताना १ मिनिट ४४.३३ सेकंदाची वेळ देत या वर्षीची ८०० मीटर्स धावण्यातली जगातली सर्वोत्तम वेळ नोंदवली.

आफ्रिका खंडातील दर्जेदार अ‍ॅथलिट्सची पळवापळवी करणार्‍या बहारिनने ११ सुवर्ण जिंकत, पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावून तगड्या चीनला दुसर्‍या क्रमांकावर ढकललं. खरं तर ही यावेळच्या आशियाई स्पर्धाशर्यतींमधील ब्रेकिंग न्यूज ठरली. २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या ९ दिवसांच्या कालावधीत दोहामधील त्याच खलिफा स्टेडियममध्ये जागतिक स्पर्धा भरणार आहे. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्सप्रेमींना लवकरच जागतिक दर्जाची कामगिरी बघायची मेजवानी मिळणार आहे. अ‍ॅथलेटिक्सप्रेमीसुद्धा पुन्हा एकवार ‘दोहा’ वर नजर ठेऊन असतील.

गुरु विजेंदरसिंग ….

संजीवनी जाधवने कांस्यपदकाची कमाई केल्यावर तिचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्याशी प्रदीर्घ बोलणं झालं. विजेंदरसिंग
म्हणाले, ‘नाशिकची हवा ही मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतींसाठी अगदी आदर्श आहे. त्याअर्थाने भारतात नाशिक आणि उटी अशा दोन ठिकाणी सराव करून अ‍ॅथलिट्सना कामगिरी उंचावता येईल. मी अपवाद म्हणून एके ठिकाणी दीर्घकाळ नाशिकमधेच राहिल्यामुळे, राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून मी बरेच अ‍ॅथलिट्स घडवू शकलो. राष्ट्रीय प्राधिकरणाचे (साई ) प्रशिक्षक दर ३ वर्षांनी बदली होत जातात.

त्यामुळे एका प्रशिक्षकाला एक अ‍ॅथलिट घडवणं कठीण जातं. लांबवरून पाणी आणणार्‍या या आदिवासी भागातील मुली किती काबाडकष्ट करतात. अनवाणी धावतात. पौष्टिक आहार न घेतादेखील नंबरात येतात. पार अगदी राष्ट्रीय शर्यतींमध्येदेखील बाजी मारतात. तरीसुद्धा त्यांच्यावर खोटेनाटे आरोप होतात. त्या मुलींची कारकीर्द डागाळायचा प्रयत्न केला जातो. संजीवनी जाधवदेखील आपल्यावर खोटेनाटे आरोप झाल्यामुळे, निराशेच्या गर्तेत जाईपर्यंत दुखावली गेली होती. जर का तडफदार संजीवनी चांगल्या जोमात सर्व करीत असती तर परवाच्या शर्यतीत संजीवनीने चांगलंच नाव वाढवलं असतं. सामान्य दर्जाचं खाऊन ती मुलगी धावली. आणि तरीदेखील पदक मिळवून गेली.

पदकतालिका.

बहारिन ११-७-४ = २२ पदकं
चीन ९-१३-७ = २९ पदकं
जपान ५-४-९ = १८ पदकं
भारत ३-७-७ = १७ पदकं
कतार २-१-३ = ०६ पदकं

भारतीय अ‍ॅथलिट पात्रता वेळ /अंतर

सुवर्ण -तेजिंदर तूर -गोळाफेक -२०.२२ मी. २०.७० मी.
सुवर्ण-गोमती मारीमुथू-८०० मी. -२:०२.७० २:००.६०
सुवर्ण-पी.यु.चित्रा-१५०० मी. -४:०६.५० ४:०६.५०
रौप्य-अविनाश साबळे -३००० स्टीपलचेस ८:३०.१९ ८:२९.००
रौप्य – शिवपालसिंग -भालाफेक-८६.२३ मी. ८३.००
रौप्य – अन्नुराणी -भालाफेक-६०.२२ मी. ६१.५०
रौप्य – स्वप्ना बर्मन -हेप्टाथलॉन-५९९३ गुण ६३००
रौप्य – मिश्र रीले -४*४००रीले -३:१६.४७
रौप्य – महिला संघ -४*४०० रीले -३:३२.२१ सर्वोत्तम १६ संघ
रौप्य – अजयकुमार सरोज-१५०० मी. -३:४३.१८ ३:३६.००
कांस्य- द्यूतीचंद -२०० मी. -२३.३४ २३.०२
कांस्य- मुरली गावीत -१०००० मी. -२८:३८.३४ २७:४०.००
कांस्य- जबीर मंदारी- ४०० हर्डल्स -४९.१३ ४९.३०
कांस्य- एम पूवम्मा -४००मी. ५३.२१ ५१.८०
कांस्य- पारुल चौधरी -५००० मी.-१५:३६.०३ १५:२२.००
कांस्य- संगीत गायकवाड-४०० हर्डल्स – ५७.२२ ५६.००
कांस्य- संजीवनी जाधव -१०००० मी. ३२:४४.९६ ३१:५०.००

दोहामधील स्पर्धाविक्रम.

पुरुष
११० हर्डल्स – झी वेंजून -चीन -१३.२१ सेकंद
४०० हर्डल्स – अब्देरहमान सांबा -कतार -४७.५१ सेकंद
पोल व्हॉल्ट – ईमेस्त ओबिना – फिलिपाइन्स -५.७१ मीटर्स
थाळीफेक-एहसान हदादि -इराण-६५.९५ मीटर्स
भालाफेक- चेंग चाऊ सून -चिनी तैपेई -८६.७२ मीटर्स

महिला

१०० मी. – ओल्गा साफ्रोनोव्हा – कझाक -११.१७ सेकंद
२०० मी. – साल्व्हा नासेर -कतार- २२.७४ सेकंद
१०००० मी. -शिताये इशिते -बहारिन -३१मिनिटं १५.६२ सेकंद
४*१०० रिले -चिनी महिला संघ -४२.८७ सेकंद
थाळीफेक – फेंग बीन -चीन -६५.३६ मीटर्स
हातोडाफेक – वांग झेंग -चीन -७५.६६ मीटर्स
भालाफेक – लू हुईहुई -चीन -६५.८३ मीटर्स

-उदय ठाकूरदेसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -