घरफिचर्ससारांशव्यवसायासाठी फर्मची निवड...

व्यवसायासाठी फर्मची निवड…

Subscribe

वैयक्तिक फर्ममध्ये स्वत: एक व्यक्ती मालक असते. तोच व्यवसायाचे सर्व निर्णय घेत असतो. तोच व्यवसायासाठी भांडवल गोळा करीत असतो. जर व्यवसायात काही बरेवाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते. निर्णय पटकन घेता येतात. वैयक्तिक फर्मला जो काही मालक आहे त्याचा जो काही कराचा स्लॅब आहे, त्यानुसार त्याला आयकर भरावा लागतो. याउलट भागीदारी फर्ममध्ये एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात. भांडवल जास्त आणता येते. कामाची विभागणी करता येते. प्रत्येकाच्या विशिष्ट ज्ञानाचा फायदा व्यवसायासाठी होतो, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो तोटा आहे तो म्हणजे भागीदारांमधील एकमेकांचे भांडण.

-राम डावरे

व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची आणि त्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, नवीन व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला तो व्यवसाय कुठल्या फर्ममध्ये सुरू करायचा यामध्ये नेहमी गोंधळ असतो. फर्म निवडायचे कुठले, त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन मगच कुठल्या फर्ममध्ये व्यवसाय करायचा हे ठरविले पाहिजे. बर्‍याच नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करायचा असतो, परंतु पुढे कसे जायचे हे माहीत नसते. व्यवसाय सुरू करताना एखादी फर्म निवडणे व त्या फर्मच्या नावाने जे काही बेसिक परवाने असतात ते काढणे आवश्यक असते. त्या फर्मच्या नावाने बँकेत खाते उघडणे अशा काही बेसिक गोष्टींनी व्यवसायाची सुरुवात होते. यासंदर्भात आपण जरा विस्तृत माहिती घेऊया.

- Advertisement -

व्यवसायासाठी फर्म निवडताना खालील पर्याय उपलब्ध असतात
१.वैयक्तिक मालकी फर्म ( proprietary firm)
२. पार्टनरशिप फर्म
३. एल. एल. पी.
४. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
५. लिमिटेड कंपनी
६. एकल कंपनी (वन पर्सन कंपनी)
असे पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीला कुठली फर्म निवडायची यात बराच गोंधळ होतो. व्यवसायासाठी फर्म निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
१. भांडवल उपलब्धता
२. भागीदाराची एकमेकांसोबत असणारी ओळख
३. फर्म रजिस्ट्रेशनसाठी लागणारा खर्च
४. त्याची नोंदणीची पद्धत व नोंदणीसाठी लागणारा कालावधी
५. एकदा फर्म तयार झाल्यानंतर त्याला वार्षिक जे काही ऑडिट, रिटर्न भरावे लागतात ते बघणे व त्यासाठी लागणारा खर्च समजून घेणे. (annual compliance charges)
६. एक फर्म दुसर्‍या फर्ममध्ये कन्व्हर्ट करता येते की नाही हेसुद्धा बघणे गरजेचे असते.
७. प्रत्येक फर्मला भरावा लागणारा आयकरचा दर हासुद्धा वेगवेगळा आहे.
८. फर्मला कोणते नाव द्यावयाचे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. वैयक्तिक फर्मला (proprietary firm) आपण कुठलेही नाव देऊ शकतो, पण बाकी फर्मसाठी नावाची आरओसीकडून परवानगी घेणे गरजेचे असते.

ह्या व अशा अनेक गोष्टी फर्म निवडताना विचारात घेणे गरजेचे असते. वैयक्तिक फर्ममध्ये स्वत: एक व्यक्ती मालक असते. तोच व्यवसायाचे सर्व निर्णय घेत असतो. तोच व्यवसायासाठी भांडवल गोळा करीत असतो. जर व्यवसायात काही बरेवाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते. निर्णय पटकन घेता येतात. वैयक्तिक फर्मला जो काही मालक आहे, त्याचा जो काही कराचा स्लॅब आहे त्यानुसार त्याला आयकर भरावा लागतो.

- Advertisement -

याउलट भागीदारी फर्ममध्ये एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात. भांडवल जास्त आणता येते. कामाची विभागणी करता येते. प्रत्येकाच्या विशिष्ट ज्ञानाचा फायदा व्यवसायासाठी होतो, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो तोटा आहे तो म्हणजे भागीदारांमधील एकमेकांचे भांडण. आपल्या मराठी लोकांमध्ये दोन लोक एकत्र आले की भिन्नता असतेच, मग ती वैचारिक असेल व कुठलीही असेल ती असतेच. त्यातून वाद होतात आणि मग व्यवसायात अडचणी सुरू होतात.

दोन लोक एकत्र येण्याआधी प्रत्येकाला समजून घेणे गरजेचे असते. प्रत्येकाचा आवाका काय, प्रत्येकाचा स्वभाव कसा, प्रत्येकाचे कौशल्य कसे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत कशी, या सर्व गोष्टींवरून एकमेकांशी जमेल की नाही हे ठरत असते. मग तुम्ही ही भागीदारी फर्म करा किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करा, यामध्ये एकापेक्षा दोन लोकांची गरज असते आणि दोन लोक एकत्र आले की त्याचे फायदे आणि तोटे हे आलेत.

म्हणून जेव्हा आपण भागीदारी फर्म करतो किंवा कंपनी करतो तेव्हा त्यावेळी कागदावर अटी-शर्ती लिहिणे (partnership deed, company memorudam etc.) फार महत्त्वाचे असते. त्या अटी-शर्ती एकदम काटेकोरपणे लिहिणे जरुरीचे आहे. कारण भविष्यात कुठलेही वाद होऊ नयेत यासाठी प्रत्येक गोष्टीचे विवेचन भागीदारी पत्रात येणे गरजेचे आहे, म्हणजे पुढे जाऊन वाद होणार नाही व ते टाळता येतील. गरज पडल्यास ज्या बाबींमुळे भविष्यात वाद होऊ शकतात त्याबद्दल वेगळा असा MOU ( memorandum of understanding) करा.

जसे आपण मुलांच्या लग्नाच्या वेळेस खूप चौकशी करतो तसेच व्यवसायात भागीदार घेताना, डायरेक्टर घेताना तशीच चौकशी करावी. कुंडली पाहून घ्यावी म्हणजे व्यवसाय संसार सुखाचा सुरू राहील.

व्यवसाय सुरू करताना आधी फर्म रजिस्ट्रेशन करा व मगच बाकी सर्व परवाने जसे की बँक करंट अकाऊंट, पॅन नंबर, जीएसटी नंबर, शॉप अ‍ॅक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन इत्यादी घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -