घरफिचर्ससारांशक्यू स्टारच्या चेतनामय सैतानाचे धोके आणि संधी!

क्यू स्टारच्या चेतनामय सैतानाचे धोके आणि संधी!

Subscribe

‘क्यू स्टार’चा उपयोग म्हणजे वास्तव जगातील नवीन आव्हानांची तसेच संधींचीदेखील मालिका आहे. मनुष्य विरुद्ध स्वयंचलित व स्वयंपूर्ण निर्णय घेणारे यंत्रमानव हे पृथ्वीवर चिंता वाढविणारे सत्य आहे. ‘क्यू स्टार’मुळे अब्जावधी लोकांना नोकरी गमावण्याचा धोका आहे, तसा नवीन संधीही निर्माण होत नवीन रोजगारही तयार होऊ शकतील. ‘क्यू स्टार’ची ‘अनचेक पॉवर’ ही विविध राष्ट्रांमधील शक्ती संतुलन उद्ध्वस्त करेल. ती फार मोठी डोकेदुखी त्या देशांतील राज्यकर्त्यांना ठरू शकते. असे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘क्यू स्टार’चा राक्षस पाताळात गाडण्यासाठी नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवजातीकडे आहे हेदेखील खरे!

-प्रा. किरणकुमार जोहरे

‘क्यू स्टार’ हे लाँच न झालेले ‘जीपीटी’चे सर्वात अद्यावत व्हर्जन होय. मानवी नैसर्गिक (नॅचरल इंटेलिजन्स) बुद्धिमत्ता ही काय करामती करू शकते याचे ‘चॅटजीपीटी’ हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘चॅटजीपीटी’ने (ChatGPT चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर) अनेक उड्डाणे घेतली आहेत. विशेष म्हणजे जगभर धुमाकूळ घालणारे चॅटजीपीटी हे गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते व लोकप्रियदेखील झाले.

- Advertisement -

खरंतर पायथॉन लँग्वेजमध्ये लिहिलेले जीपीटी व्हर्जन १ हे जून २०१८ मध्ये, जीपीटी व्हर्जन २ हे फेब्रुवारी २०१९ मध्ये, जीपीटी व्हर्जन ३ हे जून २०२० मध्ये लॉन्च झाले होते, मात्र ३० नोव्हेंबर २०२३ रोजी चॅटजीपीटीने आपला पहिला हॅपी बर्थ डे साजरा केला. चॅटजीपीटीचे स्टेबल व्हर्जन याच वर्षी मागील महिन्यात २१ नोव्हेंबर २०२३ रोजी लाँच झाले आहे. १५ मार्च २०२२ रोजी फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध असलेले जीपीटी व्हर्जन ३.५ हे तर १४ मार्च २०२३ रोजी जीपीटी व्हर्जन ४ हे पेड स्वरूपात केवळ ‘चॅटजीपीटी प्लस’ सदस्यांसाठी दरमहा २० अमेरिकन डॉलर (म्हणजे १ हजार ६६७ भारतीय रुपये दरमहा किंमत मोजत) आणि २६ भाषांना सपोर्ट करणारे लॉन्च झाले व आज वापरासाठी उपलब्ध आहे.

अब्जच्या अब्ज उड्डाणे!

- Advertisement -

चॅटजीपीटी हे जानेवारी २०२३ पर्यंत १० अब्ज वापरकर्ते मिळवत पृथ्वीवर इतिहास घडवत सर्वात वेगवान ग्राहक आकर्षित करणारे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनले होते. विशेष म्हणजे एवढ्या कमी कालावधीत ‘ओपन एआय’चे मूल्य हे २९ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे २ हजार ४१७.५० अब्ज भारतीय रुपये इतकी मिळकत हा नफा गोळा करीत झाले. याला कोटींच्या कोटी नव्हे तर ‘अब्ज च्या अब्ज’ उड्डाणे असे म्हणता येईल. ‘क्यू स्टार’ हे लाँच न झालेले ‘जीपीटी’चे सर्वात एडव्हान्स व्हर्जन होय, ज्यामुळे मानवजातीच्या प्रकाशमय भविष्यावर अंधाराचे राक्षसी काळेकुट्ट ढग निर्माण झाले आहेत.

मला काय फरक पडणार?

‘क्यू स्टार’ने मला काय फरक पडणार? असा विचार जर तुम्ही करीत असाल तर आताच सावध व्हा! कारण तुमच्यापेक्षा सक्षम व बुद्धिमान यंत्रमानव म्हणजे रोबोट तुमची जागा घेत येत्या काळात तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण करणार आहे. इतकेच नव्हे तर यंत्राची गुलामी करीत मानवजात ही वास्तवात एखाद्या सायन्स फिक्शन (सायफाय) मूव्हीला शोभेल असे अंधकारमय जीवन जगण्याच्या चक्रव्यूहात अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच प्रकाश किरण दिसणार नाही हे ‘क्यू स्टार’चे वास्तव असू शकते याची या पृथ्वीवरील अब्जावधी लोकांना कल्पनादेखील नाही.

‘क्यू स्टार’चे फायदे आणि संधी काय?

‘क्यू स्टार’चे फायदे आणि संधीदेखील आहेत. विशेषत: जेथे प्रचंड डेटा गोळा होतो आणि त्याचे अचूक आणि अत्यंत तातडीने विश्लेषण करीत सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय आतंकवाद रोखणे हा उद्देश आहे अशा ठिकाणी ‘क्यू स्टार’ उपयुक्त ठरते. विविध अणूभट्टी, अंतराळ मोहिमा, आग, अपघात होऊ नये यासाठीच्या उपाययोजना तसेच अपघात झाल्यास जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी ‘क्यू स्टार’ हे स्वयंपूर्ण निर्णय घेत मानवासाठी वरदान ठरू शकते. नैसर्गिक व मानवी आपत्तींचा सामना करण्यासाठीदेखील ‘क्यू-स्टार’ लाभदायी ठरू शकते.

‘क्यू स्टार’ हे अत्यंत प्रभावी तर्कशास्त्र आणि दीर्घकालीन रणनीतीचे म्हणजे ‘स्ट्रॅटेजिक डिसीजन’ घेण्यास मदत करते. परिणामी वैज्ञानिक संशोधनात तसेच नवनवीन आजारांवर प्रभावी व साईड इफेक्ट होणार नाही अशी औषधोपचार पद्धती विकसित करण्यासाठी ‘क्यू स्टार’ क्रांतिकारी ठरेल.

मानवजात चंद्र, मंगळ, शुक्र आदी ग्रहांवर तसेच नवीन आकाशगंगामध्ये (गॅलेक्सीज) मानवी वस्ती करीत असतानाच मानवी सभ्यतेच्या न सोडवता येणार्‍या अडचणी व जटिल समस्या त्या ग्रहगोलांवरील बदलत्या वातावरणात म्हणजे ‘डायनॅमिक एनव्हार्यमेंट’मध्ये अखंड काम करीत व भावनारहीत कठोर निर्णय घेण्यासाठी मोलाची व सहाय्यक ठरू शकणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी ‘क्यू-स्टार’ उपयुक्त ठरू शकते.

टाईम मशीनची निर्मिती, जटिल गणितीय उकल करण्यासाठी, मानवी मेंदू तसेच मानवी जिन्स यांचे जटिल कार्य समजून घेत मानवी जीवनाचा प्रवास अनंत अमरत्वाकडे नेण्यासाठी तसेच कॅन्सरसारखे असाध्य वाटणारे आजार कायमचे दूर करण्यासाठी ‘क्यू-स्टार’ उपयोगी ठरू शकते.

वनस्पती, पक्षी, प्राणी, कीटक आणि इतर सजीव किंवा निर्जीव गणना होणारे व्हायरस एकमेकांशी संवाद कसे साधतात हे समजून घेत त्यांच्याशी थेट त्यांच्या भाषेत संवाद स्थापित करण्यासाठी अभिनव इंटरफेस यंत्रणा म्हणून ‘क्यू-स्टार’ उपयोगी ठरेल. आगामी नैसर्गिक व मानवी धोके टाळण्यासाठी ‘क्यू-स्टार’ फायदेशीर आहे.

‘क्यू स्टार’चे धोके काय?

मानवी जातीला आळशी बनवत विचार व कृती करण्याची नैसर्गिक मानवी क्षमता नष्ट होणे, बेरोजगारी, यंत्रांची मानवाशी होणारी स्पर्धा तसेच भविष्यातील युद्ध आणि अनियंत्रित व स्वयंचलित अशी अनेक पॉवर हे ‘क्यू स्टार’चे मुख्य धोके आहेत, जे नजीकच्या काळात अक्राळविक्राळ राक्षसी रूप घेत पृथ्वीवरील मानवी जीवनाचा प्रकाश गिळंकृत करण्यास सज्ज झाले आहेत.

‘क्यू स्टार’ ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मजबुतीकरण शिक्षणातील ((Reinforcement learning) या अद्ययावत तसेच मॉडेल-मुक्त आणि अनुभवातून स्वत: समृद्ध होणार्‍या पद्धतीची देण आहे. त्यामुळे मानवी दृष्टिकोनातून दिसणारी एखादी गोष्ट म्हणजे कोणती चांगली किंवा वाईट गोष्ट आहे हे कॉम्प्युटर अल्गोरीदम ठरवू शकत नाही. परिणामी त्यावर आधारित स्वत:च हार्डवेअर जोडणी करीत स्वत:ला विकसित करणार्‍या यंत्रांची अद्भुत दुनिया पृथ्वीवर निर्माण होईल व वाढत जाईल. मानवी सभ्यतेशी यंत्रमानवांची ही स्पर्धा निश्चितपणे मानवाला हरवून टाकेल. पृथ्वीवर यंत्रांच्या दृष्टिकोनातून मानव हा निरोगी प्राणी ठरेल व मानवनिर्मित यंत्रेच मानवाला शोधून शोधून नष्ट करतील.

‘ए आय’मध्ये आता चेतना (Consciousness) निर्माण होत आहे. मानवी जीव घेतल्याच्या घटना व असे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत. परिणामी हे प्रोजेक्ट्स बंद केले गेलेत. ‘क्यू स्टार’ प्रोजेक्ट ही अत्यंत भयानक ‘चेतनामय सैतान’ ठरत पृथ्वीवरील मानवजात गुलाम बनवेल.

‘क्यू स्टार’चा उपयोग म्हणजे वास्तव जगातील नवीन आव्हानांची तसेच संधींचीदेखील मालिका आहे. मनुष्य विरुद्ध स्वयंचलित व स्वयंपूर्ण निर्णय घेणारे यंत्रमानव हे पृथ्वीवर चिंता वाढविणारे सत्य आहे. ‘क्यू स्टार’मुळे अब्जावधी लोकांना नोकरी गमावण्याचा धोका आहे, तसा नवीन संधीही निर्माण होत नवीन रोजगारही तयार होऊ शकतील. ‘क्यू स्टार’ची ‘अनचेक पॉवर’ ही विविध राष्ट्रांमधील शक्ती संतुलन उद्ध्वस्त करेल. ती फार मोठी डोकेदुखी त्या देशांतील राज्यकर्त्यांना ठरू शकते. असे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘क्यू स्टार’चा राक्षस पाताळात गाडण्यासाठी नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवजातीकडे आहे हेदेखील खरे! मात्र गरज आहे ती सद्सद्विवेकबुद्धी आणि नैतिकतेने टेक्नॉलॉजीला दिशा देत नियंत्रित गती देण्याची.

‘क्यू (?) स्टार’ हे मानवजातीचा ‘प्रकाश-अस्त’ करीत ‘रोबोट सभ्यतेचा उदय’ करेल काय? यंत्रांशी युद्ध करताना माणूस गुलाम न होता कसा जिंकेल? याचे खरेखुरे उत्तर काळच देईल.

-(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -