घरभक्तीपितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात करा 'या' 5 गोष्टींचा वापर

पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षात करा ‘या’ 5 गोष्टींचा वापर

Subscribe

पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. आज आपण अश्याच पाच चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही पितरांची शांती करू शकता.

- Advertisement -
  • पाणी
    पाण्याचा उपयोग तर्पण आणि श्राद्धामध्ये खूप महत्वपूर्ण मानला जातो. त्यांमुळे पूर्वजांचे तर्पण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हातामध्ये पाणी घेऊन पितरांना पाणी अर्पण केल्यास सर्वोत्तम मानले जाते. पितृ पक्षामध्ये सूर्योदयापूर्वी पिंपळाला पाणी अर्पण केल्यास पितरांना शांती मिळते.
  • अग्नि
    असं म्हणतात की, अग्निमध्ये दिलेली आहुती सरळ देवतांना पोहोचते. श्राद्धमध्ये संपूर्ण भोजनाची सर्वात पहिली आहुती अग्निमध्ये दिली जाते.
  • काळे तीळ
    काले तीळ संपन्नता आणि शांतीचे प्रतीक आहे. काळे तीळचे दान अज्ञात बाधांपासून मुक्ति मिळते. काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य दिल्यास पितरांना शांती मिळते. आहुती दिल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
  • कुश
    असं म्हणतात की, कुश विष्णूंच्या अंशापासून तयार झाले आहे. कुशामध्ये अमृत तत्वाचा वास आहे. कुशाच्या जलाने शंकरांचा अभिषेक केल्यास अनेक बाधा दूर होतात आणि पितरांना मुक्ति प्राप्त होते. कुश हातामध्ये घेऊन जल अर्पण केल्यावरच श्राद्ध प्रक्रिया पूर्ण होते.
  • उडीद डाळ
    ज्योतिष शास्त्रामध्ये उडीद डाळ शनी आणि राहूशी संबंधित आहे. पितृ पक्षात उडीद डाळ दान करणं खूप फलदायी मानले जाते.

हेही वाचा :

पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध? जाणून घ्या त्याचे महत्त्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -