मेष :- डावपेच टाकण्याचा विचार यशस्वी होईल. धंद्यात लक्ष द्या. घरातील माणसे तुमच्या कामात मदत करतील.
वृषभ :- महत्वाच्या कामात आळस करू नका. कोर्टाच्या कामात यश येईल. धंद्यात वाढ करता येईल.
मिथुन :- अपेक्षित व्यक्ती भेटेल. प्रेमातील तणाव कमी करता येईल. नोकरीत टिकून रहा.
कर्क :- तुमचा खंबरीपणा कौतुकास्पद ठरेल. फार धाडस कुठेही करू नका. दुखापत संभवते.
सिंह :- आजच्या कामात तुम्हाला अडचणीतून मार्ग शोधता येईल. दूरदृष्टीकोनातून निर्णय घ्यावा लागेल.
कन्या :- शेजारी निष्कारण भांडण उकरून काढेल. घरातील कामे अचानक करावी लागतील.
तूळ :- मुलांच्या हट्टासाठी वेगळा विचार करावा लागेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. उत्साह वाढेल.
वृश्चिक :- फेरफटका मारल्याने शरीर व मन दोन्हीही तरतरीत होत असते. याचा अनुभव घ्याल. राग करू नका.
धनु :- कठीण समस्या सोडवता येईल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यात फायदा होईल.
मकर :- दिग्गज लोकांचे सहाय्य मिळेल. विचारपूर्वक राजकीय निर्णय घेता येईल. जुने स्नेही भेटतील.
कुंभ :- साहित्याला नवा विषय मिळेल. मान-सन्मानाचा योग येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
मीन :- मनावर मोठे दडपण येईल. घरातील व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. प्रकृती सांभाळा.