घरलाईफस्टाईलस्ट्रॉने ज्यूस पिणे, नको रे बाबा!

स्ट्रॉने ज्यूस पिणे, नको रे बाबा!

Subscribe

रेस्तराँ, उसाच्या गाडीवर, ज्युस सेंटरवर आपल्याला ज्यूस पिण्यासाठी स्ट्रॉ दिला जातो. ज्यूस सेंटर चालकाने स्ट्रॉ न दिल्यास आपण त्याच्याकडे स्ट्रॉची मागणी करतो. मात्र प्रत्येक वेळेस किंवा रोजच स्ट्रॉने ज्यूस प्यायचे असल्यास थोडे थांबा. आणि हे वाचाच…

दातांच्या समस्येला आमंत्रण – दातांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून आपण स्ट्रॉने ज्यूस पिण्याला प्राधान्य देतो. मात्र स्ट्रॉने ज्यूस पिऊन आपण दातांच्या समस्यांना नकळत आमंत्रणच देतो. स्ट्रॉने ज्यूस पित असता ज्युसमधील साखरेचे थेट दातांच्या विशिष्ट भागावर मारा होतो. परिणामी दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण होऊन दात किडण्याची शक्यता वाढते. तसेच स्ट्रॉने ज्यूस पित असता दातांना डाग पडण्याची शक्यताही आहे.

- Advertisement -

सुरकुत्या निर्माण होतात – तुम्ही जर सतत स्ट्रॉच्या सहाय्याने ज्यूस पीत आहात तर तुमच्या चेहर्‍यावर सुरकुत्या निर्माण होतात. विशेषतः तोंडाच्या बाजूने पकर लाईन्स निर्माण होऊ शकतात.

हानीकारक रसायनांशी संपर्क – ज्यूस पिण्यासाठी वापरण्यात येणारे स्ट्रॉ पोलिप्रोपायलीन प्रकारच्या प्लास्टिकपासून बनविण्यात येतात. अन्न आणि औषध प्रशासनानुसार पोलिप्रोपायलीन अन्न सुरक्षित आहे. मात्र स्ट्रॉमधील रसायने ज्युसमध्ये मिसळतात. ही रसायने आरोग्यास धोकादायक असतात. त्यातच प्लास्टिकची निर्मिती पर्यावरणासही धोकादायक आहे. त्यामुळे स्ट्रॉच्या सहाय्याने ज्यूस पिण्यापूर्वी अनेकदा विचार करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -