घरलाईफस्टाईलस्वास्थ्यासाठी आरोग्यदायी तुळशी

स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी तुळशी

Subscribe

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याने याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत

तुळशी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याने याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. तुळशीमध्ये जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते त्यामूळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो. सर्दी खोकला ताप दांतदुखी श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, ह्नदयाचे विकार, या सर्वांमध्ये तुळस वापरली जाते.

- Advertisement -

तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास सर्दी खोकला बरा होतो. दातांमध्ये तुळसतेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होतात. ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते. हे त्यांच्यासाठी एक वरदान ठरते. विशेष म्हणजे तुळशीची पानं खाल्ल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. याचे नियमित सेवन केल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका खुप कमी होतो. या पानांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. यामुळे बाळ आणि आई दोघंही निरोगी राहतात.

असे आहेत तुळशीचे फायदे

- Advertisement -

 

त्वचेसाठी तुळस

तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात. स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम शरीर मॉश्चरायझर म्हणून वापरतात. स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.

कर्करोगासाठी उपयुक्त

कर्करोगातील आणि टयुमर मधील कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधींमध्ये तुळशीचा वापर होतो. यासोबत जठराचे दुखणे, डांग्याखोकला, काॅलरा, हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते.

निरोगी डोळ्यांसाठी लाभदायक

डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळसपानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळसतेल डोळयांत २,३ थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात. डोळयातील विविध व्याधींसाठी वापरल्या जाणा-या आयुर्वेदिक ड्राॅप आणि औषधीमध्ये तुळसतेलाचा वापर होतो. याशिवाय तुळशीचा वापर रेडिएशनच्या आणि विषजन्य परजिवांच्या बचावासाठी करतात.

डोकेदुखी

मायग्रेन, नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते. तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदूखी कमी केल्या जाते.

दातांच्या समस्येवर…

तुळशीच्या पानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने ५,१० मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्ये यास दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तुळशीची पाने ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो.

तुळशींचा पानांचा उपयोग किडनीस्टोनवर

तुळशीत विषजन्यपदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे गुण असतात त्यामूळे या गुणांमुळे तुळशींचा पानांचा उपयोग किडनीस्टोनवर होतो. पहाटे निर्जळी ४,५ तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळशीची पाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही. लघवी गरम होत नाही. त्यामूळे मुत्रविसर्जनात वेदना कमी होण्यास फार लाभ मिळतो.

लहान बाळांना ताप असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -