घरलाईफस्टाईलझटपट 'बेसन रवा टोस्ट' रेसिपी

झटपट ‘बेसन रवा टोस्ट’ रेसिपी

Subscribe

'बेसन रवा टोस्ट' रेसिपी

दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता काय करावा हा सर्वच गृहिणींना प्रश्न सतावत असतो. त्यात दररोजचे कांदे पोहे, गोडाचा शिरा आणि उपमा हे देखील खाऊन सतत कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते. अशावेळी बेसन रवा टोस्टही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करुन पहा.

साहित्य :

४ ब्रेडचे स्लाईस

- Advertisement -

१ वाटी बेसन

अर्धी वाटी रवा

- Advertisement -

बारीक कापलेला कांदा १ छोटी वाटी

बारीक कापलेला कोथिंबीर १ छोटी वाटी

बटर

हळद पावडर

लाल तिखट

गरम मसाला

चवीनुसार मीठ

कृत्ती :

सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी रवा, बारीक कापलेला कांदा, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य एकजीव करुन घ्या. या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून हे सारण एकत्र करुन घ्यावे. त्यानंतर पॅनवर बटर घालून सारणात मिसळून घेतलेले ब्रेड बटरवर परतवून घ्या. त्यानंतर हे बेसन रवा टोस्टटोमॅटो केचप सोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -