घरलाईफस्टाईलव्यायाम करताना 'ही' काळजी घ्या

व्यायाम करताना ‘ही’ काळजी घ्या

Subscribe

व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवून व्यायाम करण्यास सुरुवात करावी. यासाठी जाणून घ्या या वर्क आउट टीप्स.

उत्तम आरोग्यासाठी सकस आहारासोबत नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र व्यायाम करताना अनेकदा चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने, व्यायाम करण्याच्या फायद्यांऐवजी त्याचे तोटेच जाणवू लागतात. त्यामुळे व्यायाम करताना काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे असते. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवून व्यायाम करण्यास सुरुवात करावी.

  • सर्व प्रथम व्यायाम करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करुन घेणे. त्यानंतर व्यायामाला सुरुवात करावी.
  • प्रथम व्यायाम करताना सुरुवातीच्या काही दिवस खूप व्यायाम करू नये. तसेच दररोज झेपेल तेवढाच व्यायाम करत दररोज थोडा थोडा व्यायाम वाढवावा. एकाच दिवशी जास्त व्यायाम करु नये.
  • व्यायामानंतर टॉवेलने सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात कमी होतो. तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युतप्रवाह निर्माण होऊन तो शरीरातील रोगांना नष्ट करतो.
  • व्यायाम झाल्यावर लगेचच अंघोळ न करता ३० मिनिटांनंतर अंघोळ करावी. या मधल्या वेळात तुम्ही लहानसहान कामे करू शकता.
  • व्यायाम करु आल्यानंतर एखाद्या फळाचे सेवन करावे.
  • व्यायाम झाल्यावर १५ मिनिटे शांत बसून वाचन करावे. त्यानंतर ५ मिनिटे पुन्हा अंगाला तेल लावून थोडा वेळ थांबून त्यानंतर अंघोळ करावी.
  • व्यायाम करताना घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी व्यायाम करताना मधून मधून थोडं पाणी प्यावे.
  • शरीरातील इलेक्ट्रॉलची पातळी घटणार नाही, याची काळजी घ्या.
  • दररोज सहा ते सात लिटर पाणी प्या.
  • खाण्याच्या सवयींवर आणि वजनावर नियंत्रण ठेवा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -