घरलाईफस्टाईलफणसाचे रुचकर पदार्थ

फणसाचे रुचकर पदार्थ

Subscribe

घरच्या घरी तयार करा फणसापासूनचे रुचकर पदार्थ

उन्हाळा सुरु होताच बाजारात दाखल होणारा फणस बऱ्याच मंडळींना आवडतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी फणसा करता तो अनेकांना हवाहवासा वाटतो. तर अनेकांना फणस खाण्यापेक्षा फणसापासून तयार होणारे विविध रुचकर पदार्थ खाण्यास आवडतात, अशाच फणसाच्या विविध पदार्थांचा आस्वाद आपण घेणार आहोत.

फणस पोळी

- Advertisement -

साहित्य :

फणसाचा गर

- Advertisement -

साखर

तूप

कृत्ती :

फणस पोळी तयार रसाळ फणसाचा वापर केला जातो. सर्वप्रथम फणसातल्या बिया काढून त्याचा गर वेगळा करुन घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये फणसाचा गोडवा चाखून चवीनुसार साखर मिक्स करुन एकजीव करावे. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे. त्यानंतर ते ताट उन्हामध्ये वाळविण्यास ठेवावे. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा,

असे थरावर थर देऊन जाडी ५ सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवणीसाठी ठेवावे.

फणसाचा चिवडा

साहित्य :

फणसाचे गरे

मीठ

तेल

चिवडा मसाला

कृती :

फळाच्या गऱ्यांपासून उत्तम चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून बिया वेगळ्या करून चार जाड काप केले जातात. या कापांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोनतीन मिनिटे धरले जाते. त्यानंतर जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला घालावा आणि हा चिवडा बंद बरणीत भरुन ठेवावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -