घरलाईफस्टाईलशिळ्या भाताचा चटपटीत नाश्ता

शिळ्या भाताचा चटपटीत नाश्ता

Subscribe

बऱ्याचदा शिळा भात राहतो. मात्र, त्या भाताचे नेमके काय करावे? असा अनेकांना प्रश्न देखील पडतो. पण, काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहोत.

साहित्य

  • शिळा भात
  • अंदाजानुसार मिरची
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • गरजेनुसार पाणी
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे तांदळाचे पीठ/ गव्हाचे पीठ/ कॉनफ्लोअर
  • पाव चमचा जीरं
  • किसलेले गाजर
  • भोपळी मिरची
  • कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम शिळा भात, मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात हे बॅटर घेऊन त्यात कॉनफ्लोअर, जीरं, किसलेले गाजर, भोपळी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे. त्यानंतर पॅनला तेल लावून ते मिश्रण चांगले पसरवून घ्यावे, अशाप्रकारे शिळ्या भातापासून चटपटीत असा नाश्ता तयार. हा नाश्ता तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -