घरलाईफस्टाईलपाण्यात हे मिसळून प्या आणि फरक पाहा!

पाण्यात हे मिसळून प्या आणि फरक पाहा!

Subscribe

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले आहेत. पण पाण्यामध्ये काही ठराविक पदार्थ मिसळ्यानेही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. प्रामुख्याने तजेलदार चेहऱ्यासाठी काही पदार्थांचे सेवन पाण्यात मिसळून केल्यास चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते. तुम्हाला असे वाटत आहे की तुमच्या चेहर्‍याची चमक फिकी पडत आहे, सर्व उपाय केल्यानंतर देखील चेहर्‍यावर तेज येत आही आहे? तर त्याचे मुख्य कारण हे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करत नसल्याचे असू शकते. डिहाइड्रेशनमुळेदेखील चेहरा निस्तेज दिसतो. पाण्याचे सेवन केल्याने चेहरा हाइड्रेट असतो आणि हाइड्रेटिंगचे स्किनला बरेच फायदे होतात. पण तुम्हाला असे वाटत असेल की चेहरा हाइड्रेट राहण्यासोबत एक्‍स्‍ट्रा ग्‍लो देखील करायला पाहिजे तर तुम्हाला रोज एक ग्लास पाण्यात हे मिसळून प्यायला प्या आणि फरक अनुभवा.

chia-seeds
चिया सीड
  • चिया सीड आपल्या पोषक तत्त्वांमुळे सुपरफूडच्या श्रेणीत येतात. चिया सीड एंटी-ऑक्‍सीडेंट आणि ओमेगा ३ ने भरपूर असतात. जे  डल चेहर्‍याला तजेलता देण्याचे काम करते. रोज याचे सेवन केल्याने चेहर्‍याची चमक वाढते.
Dalchini
दालचिनी
  • प्यायच्या पाण्याला उकळताना त्यात चिमूटभर दालचिनी (कलमी) आणि एक तुकडा सफरचंदाचा टाकावा. नंतर त्या पाण्याला गाळून त्याचे सेवन करा. याची चवदेखील चांगली येईल आणि शरिरातील रक्तसंचार देखील योग्य राहील. यामुळे तुमच्या चेहरा तजेलदार होईल.
स्ट्रॉबेरीचा रस
  • प्यायच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळून प्यायल्याने चेहर्‍याचे डाग दूर होतील. यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात.
Honey
  • सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होते. त्याशिवाय तुमच्या स्किनचे स्पॉट देखील गायब होण्यास मदत मिळते.
पुदिन्याचे पाणी
  • पुदिन्याच्या पाण्याने तुमचे पोट साफ होते आणि स्किनवर कुठल्याही प्रकारचे डाग राहत नाही. अशात जर तुम्ही रोज सकाळी पुदिन्याचे पाणी प्यायले तर तुमची स्किन नक्कीच तेजस्वी बनेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -