घरमुंबईकाँग्रेसच्या नगरसेवकाचे पद रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

काँग्रेसच्या नगरसेवकाचे पद रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेतील पाच नगरसेविकांच्या जातीच्या दाखल्यावर आज निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर पालिकेतील पाच नगरसेविकांच्या जातीच्या दाखल्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराची वर्णी लागणार आहे. प्रभाग क्रमांक ६७ च्या भाजपा नगसेविका अॅड. सुधा सिंग यांना न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला वैध ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. तर प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणातपत्र परत न्ययालयाने फेर तपासणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठवले आहेत.

यामुळे रद्द झाले नगरसेवक पद

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी सादर केलेले जातीचे दाखले बनावट असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचा निकाल दिला आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

- Advertisement -

यांना पालिकेत नगरसेवकपदाची संधी

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना, प्रभाग क्रमांक २८ मधील एकनाथ हुंडारे, शिवसेना, प्रभाग क्रमांक ८१ मधील संदीप नाईक आणि काँग्रेस, प्रभाग क्रमांक ७६ मधील नितिन बंडोपंत सलाग्रे यांना पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.

दरम्यान काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या १८ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल होते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक ३२च्या शिवसेना उमेदवार गीता किरण भंडारी यांना देखील पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. तर सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९३,भाजपा ८५, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, समाजवादी ६, एमआयएम २ आणि मनसे १ असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

- Advertisement -

वाचा – मोदींच्या सभेकडे पाठ, गडकरींसमोर रिकामंच ताट!

वाचा – ‘राणेंचा राजीनामा घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर खलबते’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -