घरलाईफस्टाईलघरच्या फराळात शोधा 'डायट फराळ'

घरच्या फराळात शोधा ‘डायट फराळ’

Subscribe

फराळात आपण मुख्यत: पाच पदार्थ बनवतो. लाडू, चकली, शंकरपाळी, शेव आणि चिवडा...पण, हे पदार्थही आपण डाएट फराळासारखे बनवू शकतो. चला तर जाणून घेऊया 'डायट फराळ'.

खरंतर डाएटची गरज त्या लोकांना असते ज्यांचं वजन खूप वाढलेलं असतं. पण, जर तुम्ही डायबेटिक आहात किंवा जास्त तणावाखाली असाल तर तुम्हालाही डाएट केल्याचा फायदा नक्की होऊ शकतो. पण, दिवाळी हा सण आहे की, ज्यात आपण गोड, तिखट आणि काहीतरी चमचमीत खातच असतो. याचा त्रास आपल्याला आता नाही तर काही दिवसांनंतर जाणवायला सुरूवात होते. हा त्रास होऊ नये त्यासाठी आपण आधीच काळजी घेऊ शकतो. यासाठी आपण घरी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या फराळात काही बदल करु शकतो. म्हणजे त्यापासून आपलं आरोग्यही चांगलं आणि सुदृढ राहिल.

पोह्यांचा चिवडा

- Advertisement -


डाएट चिवडा बनवण्यासाठी पोहे आधी भाजून घ्यावेत. अगदी थोड्याशा तेलात शेंगदाणे, काजू, चण्याची डाळ, तीळ आणि मनुके भाजून घ्यावेत. हे सर्व मिश्रण भाजलेल्या पोह्यात मिक्स करावं. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि पिटी साखर घालावी. थोड्याशा तेलात मिरचीचे तुकडे, हळद आणि कडीपत्ता भाजावा. पोह्यांचं मिश्रण यात मिक्स करावं. जर आणखी थोडा डाएट चिवडा तयार करायचा असल्यास त्यात थोडे ओट्सही घालू शकता, अशाने तुमचा डाएट चिवडा तयार होईल.

शेव

- Advertisement -

शेवसाठी जे मिश्रण तयार केलं जातं त्या मिश्रणाला चांगलं खरपूस भाजून घ्यावं किंवा सोया शेव ही तुम्ही तयार करु शकता. प्रमाणानुसार बेसन, हळद, हिंग, लिंबाचा रस, पावडर साखर, तेल, चवीनुसार मीठ या संपूर्ण मिश्रणाला चांगलं मिक्स करुन भाजावं. तेलात तळू नये. म्हणजे तुम्हाला डाएट शेव खाता येईल.

शंकरपाळी

शंकरपाळीचं पीठ मळताना त्यात थोडंसं तेल घालावं. म्हणजे शंकरपाळी भाजूनही चांगल्या खरपूस लागतात.

चकली

चकलीच्या मळलेल्या पीठात थोडंसं तेल घालावं. म्हणजे ती भाजताना खरपूस भाजेल. त्यात असलेल्या तीळामुळे शरीराला फायबर मिळतं. त्यामुळे ते आवर्जुन घालावे. शिवाय, थोडा कडीपत्ता घालावा त्यामुळे डायबेटिस असलेल्यांना चकलीचा त्रास होणार नाही.

लाडू 

थोडंसं गोड म्हणून आपण आवडीने लाडू खातो. पण, हा लाडू खजूर, बदाम, अक्रोड, कोकोपावडर पासून बनवाल तर तो जास्त पौष्टीक बनू शकतो. शिवाय, यात ओट्स देखील घातले तरी तो आणखी पौष्टिक बनेल. हा लाडू डायबेटिक, किडनीचे आजार असलेले किंवा अॅनेमिया असणारे ही खाऊ शकतात. पण, लाडूचा आकार छोटा असावा.

वरील सर्व पदार्थ हे प्रमाणात खाल्लेत तर तुमच्या शरीरात कॅलरीज प्रमाण समतोल राहिल. त्यासोबतच जर १५ ते २० मिनिटं चालात तर जेवढी कॅलरी तुम्ही शरीरात घेतली असेल ती घामाद्वारे बाहेर पडेल. म्हणून दिवाळीच्या मूडमध्ये थोडंसं चालणं ही फार महत्त्वाचं ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -