घरलाईफस्टाईलउन्हात त्वचेस होणाऱ्या सनबर्नची घ्या घरीच काळजी

उन्हात त्वचेस होणाऱ्या सनबर्नची घ्या घरीच काळजी

Subscribe

त्वचेतील जिवंत पेशींना सनबर्नमुळे इजा होते आणि यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

कोणत्याही कामानिमित्त उन्हात सतत फिरल्याने त्वचेचा पोत खराब होऊन त्वचा काळवंडते. उन्हाळ्यात सनबर्नमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी केमिकलयुक्त क्रीमचा वापर केल्यास त्याचा संवेदनशील स्किनवर परिणाम होताना दिसतो. उन्हाचा त्रास लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील होतो. यामुळे त्वचा काळी पडणे, त्वचेची जळजळ होणे असा त्रास सहन करावा लागतो.

असे होते सनबर्न

उन्हाळ्यात सूर्याची किरणे प्रखर असतात. सनटॅन शरीराला एक संरक्षण देते, पण जेंव्हा सूर्याची प्रखर किरणे त्वचेच्या नाजूक पेशींवर जास्त होतात तेंव्हा सनबर्न होते. आपल्या शरीरात एक नैसर्गिक सनस्क्रीन असते, त्यास मिलेनीन असे म्हणतात. मिलेनीन ची साठवण जास्त प्रमाणात झाल्यास सनबर्न होते. त्वचेतील जिवंत पेशींना सनबर्नमुळे इजा होते आणि यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

- Advertisement -

सनबर्नवर करा हे घरगुती उपाय

बटाटा

- Advertisement -

बटाटा उकडून घ्या आणि त्याला थंड झाल्यावर कुस्करून सनबर्नवर लावा. बटाटा त्वचेतील ओलावा कमी न करता उष्णता शोषून घेतो. काळे डाग जाण्यासाठी देखील बटाटा उपयोगी असतो.

ओट्स
ओट्स सनबर्न कमी करण्यास उपयोगी असतात. ओट्समुळे वेदना शमतात. त्वचेला थंड वाटते.बर्फ.

बर्फ
उन्हाचा त्रास झाल्यास बर्फ त्वचेवर लावल्याने वेदना आणि लालसरपणा लवकर कमी होतो. बर्फ कापडात गुंडाळून त्वचेवर फिरवा. बर्फ लावतांना डायरेक्ट त्वचेवर लावू नका, यामुळे वेदना वाढून फ्रोस्टबाईट होऊ शकते.

मध
मधात औषधी गुणधर्म असतात. मधात अॅन्टिसेफ्टीक असल्यामुळे उन्हाने जळलेल्या त्वचेवर याचा परिणाम लवकर होतो. सनबर्न झालेल्या ठिकाणी मध लावून थोड्यावेळाने धुवून टाका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -