घरलाईफस्टाईलमिश्र कडधान्याचे हेल्दी कटलेट

मिश्र कडधान्याचे हेल्दी कटलेट

Subscribe

घरच्या घरीच पौष्टिक पदार्थ बनवून खाल्याने आरोग्यास लाभदायक ठरू शकते

वेगवान जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी खाण्या-पिण्याकडे लक्ष न दिल्याने आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो. धावपळीच्या जगात बऱ्याचदा फास्ट फूडला प्राधान्य दिले जाते. मात्र घरच्या घरीच पौष्टिक पदार्थ बनवून खाल्याने आरोग्यास लाभदायक ठरू शकते. म्हणून नक्कीच मिश्र कडधान्याचे हेल्दी कटलेट तयार करून बघा.

- Advertisement -

साहित्य
भिजलेले मूग, मटकी व मसूर मोड आलेले प्रत्येकी अर्धी वाटी, पाव वाटी हिरवे वाटाणे, दोन बटाटे उकडून कुस्करून, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, 1 चमचा चाट मसाला, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, तेल.

कृती
कडधान्ये वाफवून घ्या व मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, तिखट, मीठ, चाटमसाला, साखर कोथिंबीर घाला. एकत्र कालवून गोळा बनवा. ताटात ब्रेडचा चुरा पसरा. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून त्याला हाताने चपटे करा व ब्रेडच्या चुऱ्यावर त्यांना गुंडाळून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यावर टिक्क्या ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -