घरलाईफस्टाईलत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी खास 'फेसपॅक'

त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी खास ‘फेसपॅक’

Subscribe

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावे, असे वाटत असते. याकरता तरुणी पार्लरमध्ये जाऊन आपले सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला असा फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा खुलून दिसण्यास मदत होईल.

साहित्य

- Advertisement -
  • बेसन – २ चमचे
  • चंदन पावडर
  • हळद पावडर – अर्धा चमचा
  • कापूर – चिमूटभर
  • पाणी / गुलाबजल / दूध

असा तयार करा फेसपॅक

बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला चांगला ग्लो येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -