घरलाईफस्टाईलजाणून घ्या तिळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या तिळाच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

बऱ्याचदा पोटात थोडे तेल जाणे हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मग ते तेल खोबऱ्याचे असो किंवा शेंगदाण्याचे. पण, तिळाचे तेल देखील तितकेच आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. कारण तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अॅसिड असे तुमच्या शरीराला उपयोगी ठरणारे पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. चला तर जाणून घेऊया, यासह अजून कोणते लाभ होतात.

रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते

- Advertisement -

तिळाच्या तेलाने मसाज केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच त्या तेलाने डोक्याला आणि शरीराला मसाज केल्यास देखील फायदा होतो. याकरता तिळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.

त्वचेकरता लाभदायक

- Advertisement -

नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तिळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते. त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तिळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत होतात

लहान बाळांना तिळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तिळाच्या तेलाने हाडे मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते.

अतिरिक्त उष्णता कमी होते

शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तिळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते.

दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात

दातांमधील प्लाग काढण्यासाठी तिळाच्या तेलाचा फायदा होतो. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -