घरलाईफस्टाईलफॅशनेबल 'ब्लाऊज'

फॅशनेबल ‘ब्लाऊज’

Subscribe

शॉट हँडपासून ते लॉंग हँड पर्यंत 'ब्लाऊज'च्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात दाखल झाल्या आहेत. लग्न असो वा कॉलेजचं कोणतही फेस्टिव्हल असो आयत्यावेळी देखील आपल्याला सहजरित्या हव्या असलेल्या डिझाईंचे ब्लाऊज मिळतात.

ब्लाऊजमध्ये हल्ली खूपच वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात. शॉट हँडपासून ते लॉंग हँड पर्यंत ‘ब्लाऊज’च्या वेगवेगळ्या डिझाईन्स बाजारात दाखल झाल्या आहेत. लग्न असो वा कॉलेजचं कोणतही फेस्टिव्हल असो आयत्यावेळी देखील आपल्याला सहजरित्या हव्या असलेल्या डिझाईंचे ब्लाऊज मिळतात. असे फॅशनेबल ‘ब्लाऊज’ घातल्याने साड्या देखील उठावदार दिसण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया वेगवेगळ्या डिझाईंचे फॅशनेबल ‘ब्लाऊज’

फुल स्लिव गोल्डन नेट ब्लाऊज –

हा ब्लाऊज संपूर्ण गोल्डन असून फुल स्लिव असतो. या ब्लाऊजे हँड नेटचे असतात. तसेच या ब्लाऊजवर संपूर्ण भरलेली अँब्रोडरी असून हा ब्लाऊज डिझाईन्स साड्यांवर अधिक खुलून दिसतो.

- Advertisement -

ब्लॅक अँड गोल्डन नेट ब्लाऊज –

हा ब्लाऊज ब्लॅक अँड गोल्डन असून फुल स्लिव असतो. या ब्लाऊजमध्ये काळ्या ब्लाऊजवर गोल्डन अँब्रोडरी असल्याने हा ब्लाऊज उठावदार दिसतो.

ब्रोकेट ब्लाऊज –

हाय कॉलर ब्रोकेट हा ब्लाऊज कॉटन आणि मिक्स मॅच साड्यांवर चांगला उठून दिसतो. या ब्लाऊजवर गोल्डन वर्क उठून दिसते. साध्या साड्यांवर देखील हा ब्लाऊज घातल्याने एक वेगळा लूक येतो.

- Advertisement -

ब्लॅक कॉलर ब्लॅक नेट ब्लाऊज –

हा ब्लाऊज ब्लॅक नेटमध्ये असून या ब्लाऊजला नेटची ब्लॅक अँब्रोडरी असते. हा ब्लाऊज कोणत्याही साड्यांवर सुंदर दिसतो त्याचबरोबर तो आकर्षित देखील करणारा असतो.

जॅकेट ब्लाऊज –

हा ब्लाऊज फुल हँड किंवा थ्री फोर्थमध्ये देखील छान दिसतो. या ब्लाऊजला कॉलर असल्यामुळे या ब्लाऊजच्या बॅकला नेक नसतो. हा ब्लाऊज सिल्क साड्यांवर उठून दिसतो.

नेट अँब्रोडरी ब्लाऊज –

या ब्लाऊजच्या नेटवर अँब्रोडरी वर्क केलेले असून हा ब्लाऊज सुंदर आणि उठावदार दिसतो. हा ब्लाऊज स्लिवलेस किंवा फुल हँडचा देखील शिवता येतो. हा ब्लाऊज कॉलरचा किंवा गोल गळ्याचा असल्यास अधिक चांगला दिसतो.

मोती वर्क ब्लाऊज-

या ब्लाऊजवर मोत्यांचे वर्क केलेले असून या ब्लाऊजला मोती वर्क ब्लाऊज असे म्हटले जाते. हा ब्लाऊज कोणत्याही साड्यांवर शोभतो आणि आकर्षित दिसतो.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -