घरदेश-विदेशविरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Subscribe

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून विरोधक महागठबंधन करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे.

भाजपविरोधात एकट्याने लढण्याची ताकद नाही. म्हणून विरोधक २०१९ साली महागठबंधन करणार असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST, बेरोजगारी, नोटाबंदी, नॅशनल रजिस्टार ऑफ सिटीजन्स आणि भारत – पाक संबंधावर देखील खुलेपणाने आपली मते मांडली. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला.

वाचा – लाखो इंजिनिअर्समध्ये आवश्यक ती क्षमता नाही – पंतप्रधान

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

मुलाखतीवेळी पंतप्रधानांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीकास्त्र टाकले. नोकऱ्या उपलब्ध झाल्याची आकडेवारी मी लोकसभेमध्ये दिली आहे. शिवाय, भारताची परिस्थिती देखील सुधारत आहे. त्यानंतर देखील विरोधक बेरोजगारी वाढल्याचा दावा करत आहेत. तो हास्यास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. शिवाय, १३ कोटी लोकांना मुद्रा लोन दिले गेले. त्यामुळे अनेकांनी आपला व्यवसाय उभा केला. हा आकडा बेरोजगारीमध्ये मोडतो का? शिवाय, या १३ कोटी लोकांमुळे इतरांना देखील नोकरी मिळाली ना? त्यामुळे विरोधकांचा हा दावा हास्यास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जीएसटीमुळे देखील देशाचा फायदा झाला. टॅक्सच्या रूपाने मिळणारा पैसा आता विकासकामांकरता वापरता येईल. सत्तेमध्ये असताना त्यांनी काय केले? जीएसटी लागू करण्यासाठी त्यांना कुणी अडवले होते ? सुरूवातीला त्रास होतो. पण त्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत.

एनसीआर ( नॅशनल रजिस्टार ऑफ सिटीजन ) गळा काढणाऱ्या काँग्रेसने आसामच्या लोकांसाठी काय केले? केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. आसाममधील सर्व समस्या काँग्रेसला ठाऊक होत्या. पण राजकीय स्वार्थासाठी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यावर देखील काम करत आहोत. पण काही लोक निव्वळ राजकारण करण्यात व्यस्त आहे. एनसीआरच्या प्रश्नावर ममता बॅनर्जी देखील आता पुढे येऊन बोलत आहेत. पण, त्यांनी २००५ साली केलेले वक्तव्य आठवावे. असा टोला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना लगावला.

- Advertisement -
वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

महिला सक्षमीकरणासाठी देखील सरकारने पावले उचलली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ या अभियानातंर्गत लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यामध्ये सरकार यशस्वी झाले. त्यामुळेच मुलीच्या जन्मदरात वाढ झाल्याचे दिसून आहे. मुलींच्या शिक्षणासाठी देखील सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. हवाई दलामध्ये महिला वैमानिक झाल्या. हे देखील सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले. ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ यश देखील वाखणण्याजोगे असून त्यातून देखील महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यास सरकार यशस्वी झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्पप्न अद्याप साकार झालेले नाही. त्यामुळे आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच आमचा मंत्र आहे. प्रत्येकाच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

भाजप वाढती ताकद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता विरोधक भाजप विरोधक एकटवले असून महागठबंधनची गोष्ट चालली आहे. पण जोवर जनता आमच्या पाठिशी आहे तोवर आम्हाला काळजी करण्याची गरज नसल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इम्रान खान यांना फोन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -