घरलाईफस्टाईल'भाऊबीज'ला भाऊ, बहिणीसाठी खास ओवाळणी

‘भाऊबीज’ला भाऊ, बहिणीसाठी खास ओवाळणी

Subscribe

यंदाच्या भाऊबीजेला तुम्ही देऊ शकता खास आणि आकर्षित गिफ्ट.

दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य आणि आनंदाचा सण. या सणामध्ये विशेष म्हणजे एक अतूट नाते असते ते म्हणजे भावाबहिणीचे. भाऊ – बहिणीचे नाते अगदीच वेगळे असून ते लहानपणा पासून अनुभवलेले असते. यामध्ये एकमेकांविषयी आदर तर असतोच पण तितकीच रुसवा, फुगवा, मज्जा मस्ती देखील असते. अशाच अतूट नात्याचा सण म्हणजे ‘भाऊबीज’. यादिवशी बहिण-भावाच्या नात्याला आणखी उजाळा मिळतो. त्यामुळे या भाऊबीजेला आपल्या प्रेमळ बहिणीला काही तरी हटके आणि छान गिफ्ट द्यावे, असे प्रत्येक भावाला वाटत असते. तर भावाला देखील आपण दिलेले गिफ्ट आवडले पाहिजे, अशी इच्छा असत. मात्र, नेमके काय गिफ्ट घ्यावे हा दरवर्षी पडणारा प्रश्व असतो. परंतु, यंदा आम्ही तुम्हाला खास आणि हटके गिफ्टच्या कल्पना सांगणार आहोत.

बहिणीकरता खास हटके गिफ्ट

पर्स

- Advertisement -

लहान बहिण असो किंवा मोठी असो. सध्या पर्स ही सर्रास वापरली जाते. मग यामध्ये तुम्हाला शोल्डर बॅग, ऑफिस बॅग किंवा वॉलेट याप्रकराच्या विविध पर्स तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीकरता खरेदी करु शकता. तसेच सध्या पर्स वापरणे ही फॅशन झाल्यामुळे तुमचे हे हटके गिफ्ट बहिणीला अधिकच आवडेल.

- Advertisement -

ज्वेलरी

बऱ्याच मुलींना ज्वेलरी ही फार आवडते. त्यामुळे सध्याच्या फॅशन युगात प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अशी ज्वेलरी घालण्याचा तरुणींचा अटाहास असतो. अशावेळी वेगवेगळ्या रंगाचे आणि विविध डिजाईनचे कानातले, हातातील ब्रेसलेट आणि गळ्यातील नेकलेस तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता. त्यामुळे आपल्या बहिणीचे सौंदय अधिक खुलविण्यास मदत होते.

कपडे

मुलींना कितीही कपडे घेतले तरी ते कमीच असतात. त्याना सतत नवीन फॅशननुसार कपडे हवे असतात. त्यामुळे सध्याच्या ट्रेंडनुसार तुम्ही तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कुर्ती किंवा फॅशनेबल टॉप्स, ड्रेस, पलाझो पँट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे गिफ्ट म्हणून देऊ शकता.

भावाकरता खास गॅजेट गिफ्ट

मोबाईल चॉर्जिंग पर्स

सध्याचे बरेच भाऊ हे टेक्नो सॅव्ही असल्यामुळे ते सतत मोबाईल रिलेटेड काहींना काही घेत असतात. त्यामुळे तुम्ही यंदा तुमच्या भाऊरायाकरता मोबाईल चॉर्जिंग पर्स ओवाळणी म्हणून देऊ शकतात. कारण सतत वापरण्यात येणाऱ्या मोबाईलमुळे चार्जिंग संपते अशावेळी तुम्ही या मोबाईल चॉर्जिंग पर्सचा नक्की वापर करु शकता. कारण या पर्समध्ये पॉवर बँक इंबिल्ड असते त्यामुळे तुमचा मोबाईल फोन तुम्ही बॅगमध्ये ठवल्यास तो अॅटोमॅटीकली चार्ज होऊ शकतो.

ब्लूटूथ हेडफोन

सध्याच्या युगात सर्वच जण स्मार्ट फोनचा वापर करतात. मात्र, या धकाधकीच्या जीवनात आणि प्रवासाच्या गर्दीत एखाद्याचा फोन आला की तो उचलणे कठीण जाते. अशावेळी जर तुम्ही ब्लूटूथ हेडफोनचा वापर केल्यास तुम्हाला तो फोन त्वरित शक्य होते. त्यामुळे तुम्ही ब्लूटूथ हेडफोन तुमच्या भावाला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

फिटनेस बॅण्ड

बदललेल्या जीवनशैलीत व्यायाम हा एक महत्त्वाचा घटक होऊ लागला आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनातही बऱ्याच व्यक्ती थोडा वेळ काढून धावणे किंवा व्यायाम करणे यावर भर देत असतात. मात्र, या सर्व गोष्टींची व्यवस्थित नोंद ठेवण्यासाठी फिटनेस बॅण्ड हे नक्कीच उपयुक्त ठरतो. या फिटनेस बॅण्डमुळे तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, चालण्याचा वेग, अंतर, वेळ, कॅलरी उत्सर्जन, पाणी पिण्यासाठीचे रिमांइडर अशा असंख्य गोष्टींचे तपशील आपल्याला माहीत करून घेता येतात. तसेच सध्या तरुणवर्गात फिटनेस बॅण्ड प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या भावाच्या फिटनेस करता हे खास गिफ्ट देऊ सकता.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -