घरमहाराष्ट्रभाजपच्या कोल्हापुरातील पराभवास शिवसेनेचे संजय मंडलिक जबाबदार

भाजपच्या कोल्हापुरातील पराभवास शिवसेनेचे संजय मंडलिक जबाबदार

Subscribe

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा सुपडासाफ झाला आहे. मात्र या पराभवाचे खापर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर फोडले आहे. मंडलिक यांनी याला पाड, त्याला पाड, आपल्या मूळ संस्काराप्रमाणे राजकारण केले. त्यांनी उघडउघड काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांच्यासाठी काम केले, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा केली. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वत: न स्वीकारता ती खासदार मंडलिक आणि कोल्हापूरच्या जनतेवर टाकली. पाटील म्हणाले की, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आधीपासूनच भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी आपल्याला खासदार केले आहे, त्यांचे मला ऋण फेडायचे आहे, असे उघडपणे जाहीर करत काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच, मंडलिकांनी याला पाड त्याला पाड या आपल्या मूळ संस्काराप्रमाणे राजकारण केले. ते आपल्या सोयीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मूळ शिवसैनिकांनी या मंडलिक प्रवृत्तीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेला आमचे काय चुकले’, असा सवाल केला. ज्यांनी टोल आणला त्यांना मतदान आणि ज्यांनी टोल घालवला, त्यांना मतदान नाही. तसेच ज्यांनी कोल्हापूर सुंदर केले त्यांना मतदान नाही’ आणि ‘ज्यांनी भकास केले त्यांना मतदान’, असे एक ना अनेक सवाल चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विचारले आहे. एवढेच नाही तर आम्हाला समजून घ्यायचे आहे की, सांगली कोल्हापूरमध्ये आमचे काय चुकले. जर हे लोकांकडून कळलं तर आम्हाला चुका सुधारता येईल असे देखील पाटील यावेळी म्हणाले आहेत.

- Advertisement -

दोघांचा सन्मान ठेवून सरकार स्थापन करणार

सरकार स्थापन करताना कोणता निकष लावला जाणार, असे चंद्रकांत पाटील यांनी विचारले असता त्यांनी दोघांचाही सन्मान ठेवून सरकार स्थापन केले जाईल, असे सांगत संजय राऊत यांचे मत वैयक्तिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या जागा कमी झाल्या तरी भाजपचा स्ट्राईर रेट वाढल्याचे त्यांनी सांगत भाजपने २०१४ मध्ये २६० जागा लढवल्या होत्या. तेव्हा १२२ जागा जिंकल्या आणि आता भाजपने कमी जागा लढूनही १०५ जागा जिंकल्या, असे सांगत भाजपला सर्वाधिक मते पडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका करत आता ईव्हीएमवर बोलणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सातार्‍यामध्ये उदयनराजे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला असून, याच्या आधी जशी इतर लोकांची काळजी घेतली तशी काळजी उदयनराजेंची घेतली जाईल. त्यांना नीट सन्मान दिला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आमचे काय चुकले?
चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेला आमचे काय चुकले’, असा सवाल केला. ज्यांनी टोल आणला त्यांना मतदान आणि ज्यांनी टोल घालवला, त्यांना मतदान नाही. ज्यांनी कोल्हापूर सुंदर केले त्यांना मतदान नाही आणि ज्यांनी भकास केले त्यांना मतदान, असे पाटील यांनी सांगितले. आम्हाला समजून घ्यायचे आहे की, सांगली कोल्हापूरमध्ये आमचे काय चुकले. जर हे लोकांकडून कळलं तर आम्हाला चुका सुधारता येईल, असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -