घरलाईफस्टाईलआरोग्यदायी 'आलं'

आरोग्यदायी ‘आलं’

Subscribe

हे आहेत आल्याचे औषधी गुणधर्म

ओला मसाला घेताना आपण आलं हे हमखास मागून घेतो. आल्याचा जेवणात सर्रास वापर केला जातो. मात्र हे आलं जेवणापूर्तेच मर्यादित नसून त्याचा आरोग्याकरता देखील चांगला वापर केला जातो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आलं औषध म्हणून देखील वापरे जाते. 

  • सतत खोकला येत असल्यास एक चमच्या आल्याच्या रसात थोडेस मध घालून त्याचे चाटण करावे. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होतो.
  • अपचन, अजीर्ण, ओकारी, मळमळ आणि पोटदुखी अशा तक्रारी असल्यास आल्याचा रसात थोडा लिंबाचा रस आणि चिमूटभर सैंधव मीठ एकत्र करुन हे मिश्रण दिवसभरात दोन चमचे तीन वेळा पाण्याबरोबर घ्यावे. यामुळे या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
  • एखाद्या व्यक्तीला दम लागत असल्यास त्या व्यक्तीने एक चमच्या आल्याच्या रसात मध मिक्स करुन ते घ्यावे. यामुळे दम लागणे कमी होते.
  • अचानक दातखीळ बसणे, अंग थरथरणे, अंग गार पडणे असे झाल्यास त्या व्यक्तीला आल्याचा तुकडा चघळण्यास द्यावा. यामुळे फायदा होतो.
  • थंडीच्या दिवसात पाय गरम ठेवण्यासाठी आल्याचा रसाचा उत्तम पर्याय आहे. आल्याचा रस पाण्यात उकळून त्या पाण्याने पायाला मसाज केल्यास आराम मिळतो.
  • आले वेदनाशामक असल्याने डोके दुखत असल्यास आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करुन कपाळावर लावावा. यामुळे डोकं दुखी बंद होते.
  • कान दुखत असल्यास कानात आल्याच्या रसाचा एक थेंब कानात टाकावा यामुळे कान दुखणे थांबते.
    तसेच दाढ दुखत आल्यास आल्याचा रस कापसावर घेऊन तो कापूस दाढेवर ठेवल्यास दाढ दुखणे थांबते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -