घरलाईफस्टाईलसोयाबीन चिली

सोयाबीन चिली

Subscribe

साहित्य :-
1 वाटी सोयाबीन वडी,
1 सिमला मिरची (मोठी चौकोनी चिरून),
1 कांदा(मोठा चौकोनी चिरून),
लसूण-आले,
2 चमचे सोया सॉस,
1 चमचा टोमॅटो केचप,
4 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर,
मीठ चवीनुसार, तेल.

कृती :
* गरम पाण्यात मीठ व सोयाबीन घालून भिजवून घ्यावे.
* त्यातील पाणी घट्ट पिळून काढून टाकावे.
* एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात मीठ व पाणी घालून भिजवून घ्यावे (मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.त्यात सोयाबीन बुडवता येतील असे बनवावे)
* एका कढईत तेल गरम करून सोयाबीन कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
* एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण-आले चिरून घालावे.
* कांदा घालून 2 मी. परतून सिमला मिरची घालून परतून घ्यावे. कांदा व मिरची जास्त परतू नये, थोडे कच्चे राहू द्यावे.
* नंतर त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो केचप व मीठ घालून परतून घ्यावे.(मीठ कमी घालावे कारण सोयाबीनमध्ये आपण मीठ घातलेले आहे आणि सोया सॉसमध्येपण मीठ असते, त्यामुळे आवश्यक असल्यास मीठ घालावे)
* नंतर तळलेले सोयाबीन घालून परतून घ्यावे.
* सर्विंग प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर व आवडत असल्यास कच्ची पत्ताकोबी घालून डिश सर्व्ह करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -