घरलाईफस्टाईलदिवाळीच्या फराळावर बेतानेच मारा ताव, आहारतज्ज्ञांचा सल्ला!

दिवाळीच्या फराळावर बेतानेच मारा ताव, आहारतज्ज्ञांचा सल्ला!

Subscribe

दिवाळी फराळ खाताना आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी, याविषयी आहारतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

दिवाळी म्हटलं की सर्वात पहिलं आकर्षण असतं ते म्हणजे फराळाचं. पण, दरवर्षीप्रमाणे यंदा ही दिवाळीच्या फराळावर बेतानेच ताव मारण्याचं आवाहन आहारतज्ज्ञ करतात. शिवाय, दिवाळीत बाहेरील तयार पदार्थ विकत घेणं टाळणं गरजेचं असून घरीच केलेले पदार्थ आरोग्यदायी ठरतील, असा सल्लाही आहारतज्ज्ञ देतात. पण, तरीही एखादा पदार्थ जास्त आवडतो म्हणून त्याचं अतिसेवन करु नये. नेमस्त खा पण आरोग्यदायी खा, असा सल्ला मुंबईतील बा. य. ल. नायर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जयश्री परांजपे यांनी दिला आहे.

दिवाळीचं वातावरण असून खमंग फराळाचा सकाळी नाश्ता केला जातोय. दिवाळीच्या तोंडांवरच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अंससर्गजन्य आजाराचा अहवाल जाहीर करण्यात आला. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने बहुतांश मुंबईकर ग्रस्त आहेत. यातून मुंबईकरांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, दिवाळीतील फराळाबाबत मुंबईकरांना बिनधास्त खा, असा सल्ला आहार तज्ज्ञ देत नसल्याचं सांगण्यात येत आहे. यावर आहारतज्ज्ञ जयश्री परांजपे यांनी सांगितलं की, “मुंबईकरांची जीवनशैली बदलली आहे. पूर्वी पन्नाशीनंतर आजार दिसून येत होते. आता तरुण वयातच मधुमेह, उच्च रक्तदाब झाल्याचं आढळून येतं. मुंबईकर घरात बाहेरील अन्न पदार्थांना अधिक पसंती दर्शवतात. पण, बाहेरील पदार्थ कितीही चवीचे वाटले तरीही ते आरोग्यदायी नाहीत.”

- Advertisement -

वडापावच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत आरोग्यदायी आहार मिळेलच याची खात्री नसल्याचंही परांजपे सांगतात. त्यामुळे दिवाळी फराळही बाहेरुन विकत घेण्यापेक्षा घरी करण्याचा सल्ला ते देतात. तसेच, एखादा पदार्थ आवडला म्हणून त्यावर ताव न मारता बेताने खाण्याचाही सल्ला परांजपे यांनी दिला आहे. तेलाचे तळलेले पदार्थ खात असाल तर प्रकृतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशा सणांच्या दिवसात गोडधोड पदार्थ असल्याने इतर पदार्थांमधील चमचमीतपणा टाळण्याचंही परांपजे सांगतात.

‘हे’ पदार्थ खाल्ले तरी चालतील!

फराळातील भाजणीची चकली विविध डाळींच्या पीठाने तयार केली जाते. पण, ही चकली थोड्या प्रमाणात खाणे आवश्यक आहे. आपले पारंपरिक आहार ऋतुमानानुसार असतो. गणपतीच्या दिवसांत उकडीचे मोदक तर दिवाळीच्या काळातील तयार करण्यात येणारा फराळ हा शरीराला ऊर्जा देणारा असतो. पण, हे सर्व पदार्थ ताव मारुन खाऊ नये. तसेच मधुमेही आणि उच्च रक्तदाब रुग्णांनी पथ्य पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला परांजपे देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -