Video: सिगारेट पासून पेटवत होता रॉकेट! म्हणून बिग बी म्हणाले….

बॉलिवूडचा शहंशाहा म्हणजेच अमिताभ बच्चन सध्या ट्विटरवर फारच अॅक्टिव्ह असतात. अनेकदा अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. पुन्हा एकदा बच्चन यांनी ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिवाळी निमित्ताने आपल्या सिगारेट पासून रॉकेट पेटवताना दिसत आहे. व्हिडिओमधील हा व्यक्ती न घाबरता सतत सिगारेटचा वापर करून रॉकेट पेटवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन थक्क झाले. या व्यक्तीने केलेला पराक्रम खरोखरच धक्कादायक आहे. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, ‘हे देवा! असं भाऊ करू नका.’ बच्चन यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी त्या व्यक्तीला असं न करण्याचा सल्ला देत आहेत.

आजकाल अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. तसंच त्यांना काही दिवसांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते. लवकरच अमिताभ बच्चन अनेक चित्रपटांद्वारे पडद्यावर दिसणार आहेत. तसंच ते ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.


हेही वाचाऋषी कपूर भडकले, म्हणाले ‘गप्प बसा आता’, तर बँडवाल्याचा भलताच प्रश्न!