घरलाईफस्टाईललॅपटॉपचा अतिवापर आजाराला निमंत्रण

लॅपटॉपचा अतिवापर आजाराला निमंत्रण

Subscribe

लॅपटॉपने मानवाच्या आयुष्यात एक महत्त्वाची जागा बनवली आहे. यामुळे कंबर दुखी, पुरुषांमध्ये वंध्यत्व अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तासनतास हातात लॅपटॉप घेऊन असणार्‍या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहीजे. चला तर मग जाणुन घेऊयात लॅपटॉपमुळे कोणते नुकसान होऊ शकते.

तासंतास मांडीवर लॅपटॉप घेऊन बसल्याने त्यामधून निघणारी उष्णता तुमच्या त्वचेला कॅन्सरचे रुप देऊ शकते. जर तुम्हाला लॅपटॉप वापरणे खूप आवश्यक असेल तर शरीरापासून थोड्या अंतरावर ठेवून काम करा.

वंध्यत्व

नियमित लॅपटॉपचा वापर केल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण करू शकतो. लॅपटॉपमधून निघणारी उष्णता तुमच्या स्पर्म आणि त्याच्या गुणांवर प्रभाव पाडू शकते. यामुळे लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करू नका.तासनतास लॅपटॉप मांडीवर ठेवल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज येते का, किंवा ती जागा गरम तर होतच असेल… जर असे नियमित होत असेल तर, यामुळे तुम्हाला स्किन डिसिजसोबतच स्किनचा कॅन्सर देखील होऊ शकतो.

- Advertisement -

लॅपटॉप मांडीवर ठेवल्याने आपल्याला समोरील बाजूला वाकून काम करावे लागते. यामुळे तुम्हाला स्पाँडिलाइसिसचा आजार होऊ शकतो.

कंप्युटर व्हिजन सिंड्रोम

मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करताना तुम्ही त्याच्या स्क्रीनला खूप जवळून पाहता. यामुळे डोळ्यांवर जोर पडतो. डोळ्यात कोरडेपणा आणि डोळ्यांचा प्रकाश कमी होतो.

- Advertisement -

मानेत वेदना

मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपच्या वापराने मान खाली करावी लागते. यामुळे मानेत वेदना होतात. यामुळेही तुम्हाला स्पाँडिलाइसिस होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -