घरलाईफस्टाईलहिवाळ्यात अशाप्रकारे घ्या प्राण्यांची काळजी

हिवाळ्यात अशाप्रकारे घ्या प्राण्यांची काळजी

Subscribe

माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांची काळजी देखील हिवाळ्यात घ्या.

हिवाळा आला की आपण स्वेटर, गरम कपडे घालतो. गरम पाण्याने आंघोळ करतो. पण अशावेळेस मुक्या प्राण्यांचं काय? त्यामुळे आज आपणं पाळीव घरातल्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची ते जाणून घेणार आहोत.

पाळीव प्राण्यांना घाला गरम कपडे

- Advertisement -

हिवाळ्यात आपल्याला स्वेटर घातल्याशिवाय चैन पडतं नाही. त्याचं प्रमाणे पाळीव प्राण्याचं देखील असतं. त्यामुळे त्यांनी गरम कपडे घाला. त्यांना छानसा स्वेटर शिवून घ्या. घरात हिटर असेल तर प्राण्यांनाही ऊब मिळेलं असं बघा.

- Advertisement -

पक्ष्यांच्या पिंजऱ्यांवर घाला चादर

जर तुमच्या घरात पक्षी पाळला असेल तर त्यांना देखील ऊब मिळू द्या. एखादी चादर त्यांच्या पिंजऱ्यावर घाला. तसंच काहीकाळासाठी त्यांनी शेकोटीजवळ ठेवा.

खूप थंडी असेल तर खोलीत ठेवा

कुत्रा, मांजर, पक्षी, ससा सगळे प्राणी थंडीमुळे कुडकुडत असतात. त्यामुळे या दिवसात पाळीव प्राण्याला घराबाहेर ठेवू नका. जेव्हा खूप थंडी असेल तेव्हा त्यांना बंद खोलीतच ठेवा. प्राण्यांनाही सर्दी होते. हिवाळ्यात थंडीमुळे भटके प्राणी गाड्यांखाली झोपतात. त्यामुळे गाडी काढण्यापूर्वी गाडीखाली कोणी झोपलं नाही ना, याची खात्रजमा करून घ्या.

प्राण्यांचे केस कापू नका

कुत्रा, मांजर, ससा या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. थंडीच्या दिवसात या प्राण्यांचे केस कापू नका. कारण केसांमुळे या प्राण्यांचा थंडीपासून बचाव होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -