घरताज्या घडामोडीदिल्लीतील कपड्याच्या गोदामाला भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

दिल्लीतील कपड्याच्या गोदामाला भीषण आग, ९ जणांचा मृत्यू

Subscribe

दिल्लीत पुन्हा एकदा इमारतीला भीषण आग लागली. या आगीतून अग्निशमन दलाने १० जणांनी सुखरुप बाहेर काढलं आहे.

दिल्लीत रविवारी रात्री किरारी भागात एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्क्रिटमुळे लागली असून यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कपड्यांच्या गोदामात आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास या आगीत अनेक लोक अडकले होते. या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच अग्निशमन दलाने १० जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. याशिवायी सर्व जखमींना संजय गांधी आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पहिल्यांदा ही आग इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामाला लागली आणि त्यांनंतर आगदुसऱ्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर सिलेंडर स्फोट झाला. मृतांमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांचे कुटुंब आहे. सर्वजण वरच्या मजल्यावर आपापल्या घरात झोपले होते. त्यामध्ये मुले, वृद्ध आणि महिलांचा समावेश होता. आग लागल्यानंतर त्यांना पळण्याची संधीच मिळाली नाही.

- Advertisement -

यापूर्वी ७ डिसेंबरला दिल्लीतील राणी झांसी रोडवरील धान्य बाजारात भीषण आग लागली होती. पोलिसांच्या माहितीनुसार या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला होता. या देखील आगीचे कारण शॉर्टसर्किट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटद्वारे अपघातबद्दल दुःख व्यक्त केलं होत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -