घरक्राइमDawood Ibrahim : दाऊदचा मेहुणा खल्लास; उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या

Dawood Ibrahim : दाऊदचा मेहुणा खल्लास; उत्तर प्रदेशात गोळ्या झाडून हत्या

Subscribe

2016 मध्ये निहाल खान हा शकील खानच्या भाचीसोबत पळून गेला होता. मात्र, नंतर दोघांमध्ये मध्यस्थी झाली. शकील खान म्हणाला की, निहाल खानची 15 फेब्रुवारी रोजी फ्लाइट चुकली होती आणि तो रस्त्याने येथे आला होता. असे दिसते की, माझा भाऊ कामिल अजूनही 2016 मधील घटनेवरुन निहाल खानवर नाराज होता.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जलालाबाद येथे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झालेला मुंबईतील रहिवासी निहाल खान याची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निहाल खान हा दुसरा तिसरा कोणी नसून फरार डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता. त्याच्या कुटुंबियांनी गुरुवारी ही माहिती दिली. निहाल हा जलालाबादचे चेअरमन शकील खान यांचा मेहुणा होता. (Dawood Ibrahim Dawoods brother in law Khallas Shot dead in Uttar Pradesh)

2016 मध्ये निहाल खान हा शकील खानच्या भाचीसोबत पळून गेला होता. मात्र, नंतर दोघांमध्ये मध्यस्थी झाली. शकील खान म्हणाला की, निहाल खानची 15 फेब्रुवारी रोजी फ्लाइट चुकली होती आणि तो रस्त्याने येथे आला होता. असे दिसते की, माझा भाऊ कामिल अजूनही 2016 मधील घटनेवरुन निहाल खानवर नाराज होता. त्याचाच बदला त्याने घेतला आहे.
पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब आणि गुगल सेवा बंद झाल्या आहेत. दाऊदला आधीच किडनीच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.

- Advertisement -

खरा प्रश्न पडतो हा की, पाकिस्तान दाऊद इब्राहिमला एवढं का जपत आहे? तेही जेव्हा भारताचा मोस्ट वांटेड शत्रूला पाकिस्तानात आश्रय का दिला जातो? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही पण या सगळ्याची पर्वा न करता पाकिस्तानने भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि डी कंपनीच्या दाऊद इब्राहिमला पाकिस्तानात आश्रय दिला. उलट भारतात दहशत पसरवण्याची संपूर्ण यंत्रणा त्याच्या हाती सोपवली.

हेही वाचा : Family Court : पत्नी देणार पतीला पोटगी! इंदूर कौटुंबिक न्यायालयाचा निकाल

- Advertisement -

1993 मध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे अधिकारी असलेले प्रवीण वानखेडे यांनी माहिती दिली की, पाकिस्तानने नेहमीच अशा लोकांना पाठिंबा दिला आहे जे भारताला अस्थिर करू शकतात. नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानचा एक मोठा मोहरा बनला, ज्याने पाकिस्तानच्या चिथावणीवर देशाच्या विविध भागात ड्रग्ज, शस्त्रे आणि दहशतीचे जाळे निर्माण केले, ही पाकिस्तानची पहिली इच्छा होती. वानखेडे यांचे म्हणणे आहे की, ISI प्रमुख जनरल जावेद नासिर यांनी 1993 मध्ये दाऊद इब्राहिमला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याचे गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करण्यात मदत झाली. 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट तत्कालीन आयएसआय प्रमुख जनरल जावेद नासीर यांच्या सूचनेवरून घडवून आणले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -