घरलाईफस्टाईलजुन्या प्लास्टिकच्या कुंड्या 'अशा' करा रियुज

जुन्या प्लास्टिकच्या कुंड्या ‘अशा’ करा रियुज

Subscribe

हल्ली सगळेचजण घरा बाहेर किंवा घरात झाडे लावण्यासाठी प्लस्टिकच्या भांड्याचा वापर करतात. तसेच प्लास्टिकच्या कुंड्या या जास्तकाळ टिकाऊ असतात. पण जर का प्लास्टिकचे भांडे खराब झाले किंवा तुटले तर ते आपण लगेच टाकून देतो. तर तसे करू नये. कारण प्लास्टिकच्या कुंड्या पुन्हा आपण वापरू शकतो. तसेच जर का तुमच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या तुटल्या असतील तर त्याचा वापर कसा करावा हे नापण जाणून घेऊया…

Ideas Make Flower Pots Cement From Water Jug - Reuse Old Plastic Jar |  Cement flower pots, Flower pots, Diy concrete planters

- Advertisement -

1. माती फिल्टर करण्यासाठी

जर तुमच्याकडे प्लास्टिकचे भांडे जुने असेल तर तुम्ही माती गाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंडीचा वापरू शकता. अनेकदा माती गाळण्यासाठी वेगळी चाळणी वापरावी लागते. पण तुम्ही प्लास्टिकच्या कुंडीचा वापर करून तुम्ही ही माती गाळून घेऊ शकता. यासाठी प्लास्टिकच्या भांड्याला छिद्र पडून याचा वापर तुम्ही सहज करू शकता. यामुळे माती चांगली गाळून निघेल.

2. सूर्यप्रकाशापासून वनस्पतींचे संरक्षण

जर तुमच्या घरात झाडे असतील तर तुम्हाला हे माहितच असले की कधीकधी कडक सूर्यप्रकाशामुळे झाडे सुकतात आणि कोमेजतात. अशा परिस्थितीत अनेक माणसे भांड्यांची जागा वारंवार बदलत राहतात. ज्यामुळे झाडे खूप खराब होतात. तसेच जर का तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर तुम्ही या खराब प्लास्टिकच्या कुंडीचा वापर करून इतर झाडे वाचवू शकता. आता या प्लॅस्टिकच्या भांड्यांना लहान छिद्रे पाडा. नंतर ज्या झाडांवर सूर्यप्रकाश येत असेल त्यावर ही खराब कुंडी ठेवा.

- Advertisement -

How to reuse plastic bottles for plants as planters

 

नको असलेली माती भरून ठेवण्यासाठी जुन्या कुंडयांचा करा वापर

  • अनेकदा लोक टाकाऊ भांडी फेकून देतात, पण आता असे करू नका.
  • तसेच मातीची भांडी अनेकदा फुटतात आणि आता काय करावे हे अनेकांना समजत नाही.
  • जे भांडे फुटले आहे त्यामध्ये असलेली माती विखुरल्यामुळे झाडांना इजा होते,.
  • अशा परिस्थितीत तुमच्याकडे दुसऱ्या मातीचा चांगला साठा असणे महत्त्वाचे आहे.
  • म्हणून जर का तुमच्या कडे जुन्या कुंड्या असतील किंवा खराब झालेल्या असतील तर त्या कुंडीत माती भरून ठेवा.
  • याशिवाय प्लॅस्टिकच्या या भांड्यांचा तुम्ही मजबुतीसाठी वापर करू शकता.
  • अशी अनेक झाडे आहेत ज्यांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी घट्ट भांडे आवश्यक आहे.
  • त्यामुळे खराब प्लॅस्टिकच्या कुंड्यांमध्ये रोपे लावून तुम्ही पुन्हा मातीच्या कुंडीत रोपे लावू शकता.
  • असे केल्याने तुमची झाडे मजबूत होतात.

हेही वाचा :  आर्टिफिशियल फुलझाडे अशी करा स्वच्छ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -