घरलाईफस्टाईलगिरवूया व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

गिरवूया व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

Subscribe

आजच्या स्पर्धेच्या युगात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर होणे पुरेसे नाही. आज आपल्याला नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपला सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास होणे यालाच थोडक्यात व्यक्तिमत्त्व विकास असे म्हणतात. मग व्यक्तिमत्व विकास साध्य करायचा कसा तेच आपण जाणून घेऊयात.

स्वतःला ओळखा – प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले, वाईट दोन्ही प्रकारचे गुण असतात. त्यानुसार स्वतःमधील चांगले, वाईट दोन्ही प्रकारचे गुण ओळखा. स्वतःमधील चांगले गुण, सवयी वाढवण्याचा प्रयत्न करावा. तर वाईट गुण, सवयींवर मात करावी.

- Advertisement -

लोकांशी जोडलेले राहा – व्यक्ती तेवढ्या प्रकृती, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यानुसार दररोज नवीन लोकांना भेटा. त्यांच्याशी संवाद साधा. तसेच त्यांच्याशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला रोज नवीन काही शिकता येईल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.

आत्मपरीक्षण करा – व्यक्तिमत्व विकासात आत्मपरीक्षण करणे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. असे केल्याने आपल्यातील चांगल्या, वाईट बाबी समोर येतात. त्यामुळे आपण चूक की बरोबर हे समजण्यास मदत होते. तसेच अनेकदा आपण निवडलेला मार्ग योग्य की अयोग्य हे समजण्यास मदत होते.

- Advertisement -

वाचन करा, नवीन छंद जोपासा – आपल्या आवडत्या विषयावर किंवा पुस्तकातील दररोज किमान ५ ते ६ पाने वाचा. असे केल्याने ज्ञानात तर भर पडतेच. शिवाय आपल्यातील समजूतदारपणा वाढण्यास मदत होते. तसेच एखादा छंद जोपासावा. जेणेकरून आपला फावला वेळ सत्कर्मी लागेल. यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास देखील मदत होते.

स्वतःचे मत असुद्या – स्पर्धेच्या युगात स्वतःचे मत असणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार स्वतःचे मत असुद्या. असे केल्याने तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार नाही तसेच कोणीही तुम्हाला गृहीत धरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -