घरफिचर्स‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ एक आशा - एक दिलासा !

‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ एक आशा – एक दिलासा !

Subscribe

आपल्यासारख्या महाकाय देशात पी.एफ.आणि पीपीएफ असे भविष्यकालीन उत्पन्नाचे पर्याय असताना आता राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) हा आणखीन नवा पर्याय कशाला? अशी शंका अनेकांच्या मनात उभी राहिली. एकीकडे मिलसारखे स्थिर उत्पन्न आणि रोजगार-निर्मितीचे उद्योग ठप्प होत होते, अनेक उत्पादन कंपन्या डबघाईला आल्याने बंद पडत होत्या. कायमच्या नोकरीपेक्षा ‘कंत्राटदारी’ पद्धत अधिक रूढ होत होती आणि हे सगळे होत असताना आपल्या प्रकल्पाची यशस्वी कामगिरी व्हावी म्हणून बजेट आणि किफायतशीर मार्ग अवलंबले जात होते. प्रकल्पातून कंपनी उभी रहात असताना ‘कायमचे कामगार’ सांभाळणे सोयीचे नव्हते. म्हणून तर ‘पेन्शन’ हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर नव्हता. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सामायिक धोरण निर्माण करून एक पेन्शन पॉलिसी असावी या हेतूने एनपीएस योजनेचा जन्म झाला.

पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतर म्हणजेच कामधाम करण्याचे वय झाल्यानंतरची एक प्रकारची आर्थिक सोय. म्हातारपणी काम करण्याची क्षमता कमी होते, आरोग्य चांगले असले तरी काम मिळतेच असे नाही. कुटुंबाच्या मुख्य जबाबदार्‍या जरी कमी झालेल्या असल्या तरी आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा आणि उतारवयात आरोग्यासाठी होणारा खर्च याची तजवीज करावी लागते. सर्वच नोकर्‍यांमध्ये पेन्शन मिळतेच असे नाही. असंघटित उद्योगात किंवा रोजंदारीवर काम करणार्‍या तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचारी/कामगार ह्यांच्या भविष्यकाळाची तरतूद करणे हा एक मुख्य हेतू म्हणता येईल. याकरिता केंद्र सरकारने २००४ साली पीएफआरडीए म्हणजेच [PFRDA= Pension Fund Regulatory & Development Authority] ह्यानुसार एनपीएसची सुरुवात केली. संपूर्ण देशात पेन्शनबाबत निधी उभा करणे, व्यवस्थापन आणि नियमन करणे या हेतूंनी ही एक सरकारी योजना साकार झाली. आजच्या घडीला नेमके काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

राष्ट्रीय पेन्शनची निकड – आपल्यासारख्या महाकाय देशात पी.एफ.आणि पीपीएफ असे भविष्यकालीन उत्पन्नाचे पर्याय असताना आता आणखीन नवा पर्याय कशाला? अशी शंका अनेकांच्या मनात उभी राहिली. एकीकडे मिलसारखे स्थिर उत्पन्न आणि रोजगार-निर्मितीचे उद्योग ठप्प होत होते, अनेक उत्पादन कंपन्या डबघाईला आल्याने बंद पडत होत्या. असे असताना दुसर्‍या बाजूने सेवा-क्षेत्र ओपन होत होते, त्यातून हॉटेल, ट्रान्स्पोर्ट, शिक्षण-क्षेत्र अशी नवनवीन सेवा-क्षेत्रे सुरू होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवत होती. कला-कौशल्य असणार्‍या मंडळींना जॉब किंवा बढती तशी सहजपणे मिळू लागलेली होती. टुरिझम, कॉल-सेंटर्स – बीपीओ, कोचिंग क्लास, ट्रान्सपोर्ट ठेकेदार, माल-वाहतूकदार असे नवीन बलुतेदार उभे रहात होते. त्याचप्रमाणे कायमच्या नोकरीपेक्षा ‘कंत्राटदारी’ पद्धत अधिक रूढ होती. आणि हे सगळे होत असताना आपल्या प्रकल्पाची यशस्वी कामगिरी व्हावी म्हणून बजेट आणि किफायतशीर मार्ग अवलंबले जात होते. प्रकल्पातून कंपनी उभी रहात असताना ‘कायमचे कामगार’ सांभाळणे सोयीचे नव्हते. म्हणून तर ‘पेन्शन’ हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर नव्हता. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सामायिक धोरण निर्माण करून एक पेन्शन पॉलिसी असावी या हेतूने एनपीएस योजनेचा जन्म झाला. ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. आजपर्यंत आपल्याकडे ‘भविष्य निर्वाहासाठी तीन

प्रकारच्या संकल्पना -योजना कार्यान्वित आहेत :-
१] इ.पी.एफ.- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
२] पी.पी.एफ.- पब्लिक प्रोव्हिडंट फंड
३] एम.एफ.- म्युचुअल फंड
४] एन.पी.एस.- राष्ट्रीय पेन्शन योजना
एनपीएसची माहिती आणि ठळक वैशिष्ठ्ये -आज देशात वरील पर्याय उपलब्ध असले तरीदेखील सर्वात स्वस्त आणि मार्केट-लिंक असा हा एकमेव प्लान आहे.
१] सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचार्‍यांसाठी होती, नंतर इतरांसाठी विस्तारीत करण्यात आली.
२] किमान गुंतवणूक – रु ६०००/- एक रकमी किंवा काही भागात भरले जावेत अशी अपेक्षा
किंवा रु ५००/ च्या पटींत गुंतवले जावेत.
३] वयाची अट – कोणीही भारतीय नागरिक – किमान १८ ते ६० पर्यंत
४] दोन मुख्य प्रकार :
अ] टिअर वन [Tier-1] प्रकार -मुख्य खाते -पेन्शनच्या हेतूने उघडलेले बचत खाते
हा सर्वसाधारण गुंतवणूक प्लान म्हणता येईल. पैसे काढण्याबाबत काही बंधने आहेत.
१] वय – ६० पूर्ण होण्याआधी काढल्यास-आजवर केलेल्या गुंतवणुकीपैकी फक्त – २० टक्के इतकीच रक्कम काढण्याची मुभा असते
२] वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर – अ] आजवर केलेल्या गुंतवणुकीपैकी फक्त -६० टक्के इतकी रक्कम काढण्याची मुभा
ब] आपल्या गुंतवणुकीपैकी उर्वरित ४० टक्के इतकी रक्कम ही वार्षिक एन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावी लागते
ब] टिअर टू [Tier-2] प्रकार – दुय्यम असे नाही म्हणता येणार, परंतु उत्स्फूर्त-स्वेच्छेने उघडले जाणारे बचत खाते

- Advertisement -

– पैसे काढण्याबाबत बंधन नाही
– ऑफ-लाईन आणि ऑन-लाईन पद्धतीने खाते उघडता येते.
– मात्र पूर्वी पैसे भरताना स्वत:चे स्व-कमाईतील असावेत अशीच अपेक्षा आहे, परंतु असे लक्षात आले की त्रयस्थ-म्हणजेच थर्ड पार्टीचे पैसेदेखील अशा खात्यात भरले जात आहेत आणि एकूण खात्याचा आणि योजनेच्या हेतूचा गैरअर्थ काढून गैरवापर केला जात आहे. हे थांबवण्यासाठी सरकारने लागलीच सर्क्युलर काढून हे थांबवण्याचे ठरवले. अनधिकृत मार्गाने कमावलेला काळा पैसा किंवा गैरमार्गाने मिळवलेला बेहिशेबी पैसा ह्यात भरला जावू नये. कारण अशा काही योजनांचा तथाकथित मंडळींकडून गैरवापर केला जातो आणि मूळ हेतूला सुरुंग लावला जातो.

– पॅन कार्ड [Pan Card] बंधनकारक
एकाचवेळी टिअर – वन आणि टिअर -टू अशी दोन्ही प्रकारची खाती एखादी व्यक्ती उघडू शकते. एक परमनंट स्वरूपाचे निवृत्ती-पश्चात उत्पन्नाची सोय करणारे आणि दुसरे बचत-सुविधा देणारे खाते.
क] स्वावलंबन – असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपले पैसे गुंतवावेत म्हणून सरकारने ही खास योजना सुरू केलेली आहे. ह्यात सरकार स्वत:चे रु १०००/ असे देते, ह्यामागचा हेतू हा की कामगाराने या योजनेत सहभागी व्हावे. मात्र कामगाराने स्वत:चे असे किमान रु. १०००/ ते रु. १२,०००/असे वर्षाला गुंतवणे अपेक्षित आहे.
३] फंड मॅनेजर्स -गुंतवणूकधारांनी गुंतवलेले पैसे सांभाळून योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचे काम असे फंड मॅनेजर करतात.
तीन सरकारी फंड मॅनेजर्स-
अ] एल.आय.सी. पेन्शन प्लान
ब] एस.बी.आय.पेन्शन प्लान
क] युटीआय रिटायरमेंट प्लान
४] अन्य सहा फंड मॅनेजर्स खालीलप्रमाणे-
१] आय.सी.आय.सी.आय.प्रुडेन्शियल २] आय.डी.एफ.सी. पेन्शन ३] कोटक म्युचुअल पेन्शन
४] रिलायंस कॅपिटल पेन्शन ५] एस.बी.आय. पेन्शन फंड ६] युटीआय रिटायरमेंट सोल्युशन
७] एचडीएफसी पेन्शन

५] एनपीएसचे पैसे कसे व कुठे गुंतवले जातात –
कोणतीही गुंतवणूक ही केवळ साठवण्याकरिता किंवा चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नसते. त्याचे मूल्य वाढावे आणि मूळ मुद्दल वाढावी हा मुख्य हेतू असतो. त्याकरिता असा जमा झालेला निधी हा योग्य जागी गुंतवावा लागतो. देशातील एकूण अर्थ-वृद्धीचे पर्याय लक्षात घेता – शेअर्स आणि रोखे हे दोनच सशक्त पर्याय असल्याचे जाणवते. दोन्हींची काही वैशिष्ठ्ये आहेत. गुण आणि दोषही आहेत. ह्यातून समन्वय साधणारी इन्व्हेस्टमेंट करून खातेदारांचा पैसा सांभाळून त्याचे मूल्य कसे वाढेल असे जबाबदारीचे काम फंड मॅनेजरना करावे लागते. हे सर्व गृहीत धरून खालील प्रकारे गुंतवणूक करता येते.

१] अ‍ॅक्टिव्ह चॉईस- ह्यात तीन उप-विभाग असतात
इ-प्रकारची पद्धत- ह्यामध्ये ५० टक्के रक्कम इक्विटी म्हणजेच शेअर्समध्ये आणि उर्वरित पैसे डेब्टमध्ये ठेवले जातात
सी-प्रकारची पद्धत- ह्यातील निधी हा सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के पैसे हे कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये गुंतवले जातात
जी-प्रकारची पद्धत- इथे गुंतवलेला निधी हा पूर्णतः सरकारी रोखे म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये ठेवला जातो.

२] ऑटो चॉईस -लाईफ सायकल फंड

३] तिसरा एक प्रकार म्हणजे इ/सी आणि जी अशा तिन्ही प्रकारचे मिश्रण केले जाते, ते पुढीलप्रमाणे :-
इ- प्रकार – ७०% / सी-प्रकार – १५% / जी प्रकार – १५%

६] एनपीएस खाते कुठे व कसे उघडाल ?
जसे आपण एखाद्या बँकेत खाते उघडतो, साधारण तशीच पद्धत असते. आपल्याला फॉर्म भरावा लागतो. योजनेची निवड करावी लागते. टीअर वन की टू हे सांगावे लागते. खेरीज बँकेप्रमाणे केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

७] खाते दुसर्‍या एनपीएस फंड मॅनेजरकडे ट्रान्सफर करता येते का?
हो आपल्या एखाद्या फंड मॅनेजरची योजना आवडली नाहीतर, तुम्हाला आवडेल त्या फंड मॅनेजरकडे तुमचे असे खाते बदली करता येते. ह्याला ‘स्विचिंग’ असे म्हणतात. मात्र असे खाते बदलणे वारंवार करता येत नाही. नियमानुसार फक्त वर्षातून एकदा असे करता येते, तुमचे एनपीएस खाते दुसरीकडे बदलता येते.
खाते उघडल्यावर आधी तुम्हाला १७ आकडी [17-Digit] एक क्रमांक मिळतो आणि त्यानंतर Permanent Retirement Account Number (PRAN)असा एक कायमचा नंबर तुम्हाला दिला जातो.

८] कर-सवलत – एनपीएसमध्ये गुंतवलेल्या रु .५०,०००/ या रकमेवर कर-बचत होते. ही सवलत २०१६ च्या अर्थ-संकल्पापासून सुरू आहे. मात्र या योजनेकडे केवळ कर वाचवण्याची योजना म्हणून पाहू नये. कारण मूळ हेतू हा तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमच्या हाती कसा पैसा खेळता राहील हे पाहणे. तुम्ही तरुण असताना जे काही उत्पन्न कमावत असता, त्याचा काही टक्के भाग हा म्हातारपणासाठी बाजूला काढणे आणि भविष्याची तरतूद करणे हा मुख्य हेतू आहे. कारण आता नवीन जन्माला आलेल्या कंपन्या आपल्या स्टाफच्या भविष्याची अजिबात चिंता करत नाहीत. कारण मुळातच त्यांना परमनंट स्टाफ नको आहे, मग त्यांच्या निवृत्तीची देखभाल-तजवीज ते का म्हणून करतील? ते काम आपले आपल्यालाच करावे लागणार आहे, विशेषतः आजच्या तरुण वर्गाला.

९] काही खटकणारे मुद्दे –
१] इक्विटीमध्ये १००% गुंतवणूक करण्याची अजूनतरी सोय नाही
२] दीर्घकाळ पैसा अडकून पडतो असे काहीना वाटते
३] फंड मॅनेजमेंट तितके अ‍ॅक्टिव्ह नाही
४] एन्युइटीमध्ये पैसे गुंतवण्याची सक्ती जाचक वाटते
५] एन्युइटी हे करपात्र उत्पन्न समजले जाते
सर्व जगभरात पेन्शन-मार्केटला तसे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण अधिक निधी जमा केला जातो आणि विविध प्रकारच्या असेट्समध्ये इन्व्हेस्ट केला जातो. आज आपले पेन्शन मार्केटही मोठे आहे. उतार-वयात जेव्हा पैसे कमावण्याची क्षमता नसते, तेव्हा अशी पेन्शन उपयोगी पडते आणि पाश्चात्य देशात जशी सोशल सिक्युरिटी आहे, तशी आपल्याकडे नसल्याने एनपीएस असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच ह्याकडे कमावत्या तरुणांनी लक्ष दिलेच पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -