घरलाईफस्टाईलअसा दूर करा थकवा!

असा दूर करा थकवा!

Subscribe

या काही गोष्टी केल्यास तुमचा थकवा सहज दूर होण्यास मदत होते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येकाची पळापळ ही सुरुच असते. आणि अशा धावपळीत बऱ्याच जाणांना थकवा येतो. अशावेळी नेमके काय करावे?, असा प्रश्न देखील उपस्थित होतो? चला तर मग पाहुया कसा दूर करावा थकवा.

  • सर्वप्रथम प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, माणसाला कमीत कमी ६ तास तरी झोप असावी. त्यामुळे तुम्ही तेवढी झोप घ्यावी. यामुळे चिडचिड देखील होणार नाही. कारण अपुपी झोप मिळाली की चिडचिड होते. तसेच जास्तवेळ देखील झोपू नये, यामुळे अधिक आळस येतो.
  • तसेच आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तेलाने मालिश करा.
  • आंघोळ करताना पाण्यात थोडे मीठ घालावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे रक्तपुरवठा सुधारतो आणि ताजेतवाने वाटते.
  • अनेकांना शॉवरखाली आंघोळ करायला आवडते. अशा व्यक्तीने शॉवरखाली थोडावेळ उभे रहावे.
  • जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रीत असते. व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहयुक्त जेवनाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
  • व्यायामामुळे रक्तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा आणि मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
  • थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे असते. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते आणि थकवा येतो. अशावेळी दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा आणि नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
  • रंगाचासुद्धा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे नारंगी, लाल, पिवळा, हिरवा हे रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न देखील वाटते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -