घरक्रीडाभारतीय गोलंदाजांतील सुधारणा वाखाणण्याजोगी!

भारतीय गोलंदाजांतील सुधारणा वाखाणण्याजोगी!

Subscribe

इरफान पठाणचे मत

भारतीय गोलंदाजांमधील सुधारणा वाखाणण्याजोगी आहे, असे मत भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने व्यक्त केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार यांसारख्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मागील काही वर्षांत घरच्या मैदानांवर आणि परदेशातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शमी (३३), ईशांत (२५) आणि उमेश (२३) या त्रिकुटाने मिळून यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये २० पेक्षाही कमीच्या सरासरीने ८१ मोहरे टिपले. एका वर्षात एकाच संघातील तीन गोलंदाजांनी २० पेक्षा कमीच्या सरासरीने प्रत्येकी २० हून अधिक विकेट्स मिळवण्याची ही केवळ दुसरी खेप आहे. त्यामुळे इरफानने या गोलंदाजांचे कौतुक केले.

भारताच्या गोलंदाजांनी यावर्षी अप्रतिम कामगिरी केली. भारताची सध्याची गोलंदाजांची फळी ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फळींपैकी एक आहे. ते विकेट्स मिळवण्याच्या उद्देशाने गोलंदाजी करतात. ते चेंडू चांगल्या वेगाने स्विंग करतात. चेंडू जुना आहे की नवा, याने त्यांना काहीही फरक पडत नाही. भारतीय गोलंदाजांतील, खासकरून वेगवान गोलंदाजांतील सुधारणा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्यामुळे हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खास झाले, असे इरफान म्हणाला.

- Advertisement -

हा २०१९ मधील आवडता क्षण -लक्ष्मण
भारताने यावर्षी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा नमवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. विराट कोहलीच्या संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताची ही कामगिरी फारच कौतुकास्पद होती, असे भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणला वाटते. तसेच त्याने पुढे सांगितले, भारतीय क्रिकेट संघासाठी हे वर्ष चांगले गेले. माजी कसोटीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत हे माझे स्वप्न होते. माझ्या कारकिर्दीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात पराभूत केल्याचा मला आनंद आहे. हाच माझा २०१९ वर्षातील सर्वात आवडता क्षण होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -