घरमहाराष्ट्रहरवलेली चिमुकली व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे ७ तासात सापडली

हरवलेली चिमुकली व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे ७ तासात सापडली

Subscribe

कार्तिकी घरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतर लांब गेली आणि घराचा रस्ता विसरली. आई वडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे हरवलेली मुलगी अवघ्या ७ तासामध्ये सापडल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. शहरातील १० वर्षीय मुलगी राहत्या घरातून न सांगता मंदिरात गेली. मात्र, ती रस्ता विसरल्याने हरवली होती. कार्तिकी खोडके असं या १० वर्षाच्या मुलीचे नाव आहे. कार्तिकी घरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतर लांब गेली आणि घराचा रस्ता विसरली. आई वडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे घाबरलेल्या कार्तिकीच्या कुटुंबियांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलीचा फोटो व्हॉट्सअॅपवर वायरल करत शोध घेतला. व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे कार्तिकी सापडली.

घरी न सांगता मंदिरात गेली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गीताई अपार्टमेंटमध्ये राहणारी कार्तिकी मंदिरात आई-वडिलांना न सांगता निघून गेली. पण घरी परत येताना ती घराचा रस्ता विसरली. घरात मुलगी नसल्याने तिची आई-वडील घाबरले. त्यांनी परिसर पिंजून काढला. मात्र कार्तिकी सापडली नाही. अखेर त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. भोसरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाणसह १५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. तसेच बेपत्ता कार्तिकीचा फोटो आणि मोबाईल नंबर स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर वायरल केला.

- Advertisement -

सात तासानंतर सापडली कार्तिकी

कार्तिकीचा शोध सुरु असताना तब्बल तब्बल सात तासानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो पाहून एका सजग नागरिकाने फोनद्वारे मुलीच्या वडिलांना आणि भोसरी पोलिसांना संबंधित मुलगी ही दिघी रोड मयूर मंगल कार्यालय येथे असल्याची माहिती दिली. तातडीने भोसरी पोलिसांनी जाऊन खात्री केली असता कार्तिकी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसली होती. तब्बल सात तासानंतर आपली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांना खूप आनंद झाला. दरम्यान, व्हॉट्सअॅपचा योग्य तो वापर केल्यास त्याचा फायदा देखील होऊ शकतो हे पोलिसांनी दाखवून दिलं.

हेही वाचा – 

- Advertisement -

‘व्हॉट्सअॅप’ सुरक्षित ठेवण्यासाठी या खास टीप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -