घरमुंबईसंत वासवानींच्या पुतळ्यासमोर भाजप नेत्याचे बॅनर; पालिकेची कारवाई

संत वासवानींच्या पुतळ्यासमोर भाजप नेत्याचे बॅनर; पालिकेची कारवाई

Subscribe

उल्हासनगर शहरात अनधिकृतपणे बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

उल्हासनगरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश मखिजा यांच्या वाढदिवसाचे अनधिकृत बॅनर सिंधी संत साधू वासवानी यांच्या पुतळ्यासमोर लावल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी मनपा प्रशासनाला तक्रार केल्यानंतर दोन तासांमध्ये हे बॅनर हटविण्यात आले आहे.

तक्रारीनंतर दोन तासात कारवाई

उल्हासनगर शहरात गोल मैदान परिसरात सिंधी समुदायाचे थोर संत साधू वासवानी यांच्या पुतळ्यासमोर स्थानिक भाजप नेते व माजी नगरसेवक प्रकाश माखिजा यांच्या वाढदिवसाचे भव्य बॅनर सोमवारी रात्री लावण्यात आले होते. आज सकाळी हे बॅनर लोकांच्या निदर्शनास आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. साधू वासवानी मिशनच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार म्हणजे थोर संतांचा अवमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उल्हासनगर मधील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी सोशल मीडियावर अनधिकृत बॅनरचे फोटो व्हायरल केले. या संदर्भात उल्हासनगर मनपाचे प्रभाग समिती १चे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्याकडे सकाळी १० वाजता तक्रार केली. आणि हा बॅनर त्वरित हटविण्याची मागणी केली. जाधव यांनी तत्परता दाखवून आपल्या कर्मचाऱ्यांद्वारे दोन तासांत हा बॅनर हटविले. या बाबत खानचंदांनी यांनी जाधव यांचे आभार मानले. शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल करण्याची मागणी

शहरातील अनधिकृत बॅनर्सवर मनपा प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येते. मात्र पोलिसात या संदर्भात रीतसर कारवाई करून आरोपींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, अशी कारवाई होत नसल्याने शहरात अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्या नेत्यांना कायद्याची कायद्याचा धाक राहिलेला नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करा. आणि जर माझी माहिती चुकीची निघाली तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे आव्हानच खानचंदानी यांनी पोलिसांना दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -