घरमहाराष्ट्रकोरोना फोफावतोय, राज्यात २४ तासात ११ हजार १४१ कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना फोफावतोय, राज्यात २४ तासात ११ हजार १४१ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात २४ तासामध्ये ६०१ ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होतान दिसत आहे. कोरोना संसर्ग पुन्हा फोफावला असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासामध्ये ११ हजार १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत एकूण ५२ हजार ४७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ९७,९८३ हजाराच्या घरात पोहोचले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी आणि कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे.

राज्यात २४ तासामध्ये ६०१ ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. तसेच एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन

औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोनामुळे ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाविद्यालये बंद मात्र ऑनलाईन शिकवणी सुरु राहिल, दुकाने, बाजारपेठा, मॉल, कार्यालये, आठवडी बाजार बंद असणार तसेच इतर अस्थापना बंद असतील. बँक चालु असणार आहे. शनिवार आणि रविरा पुर्ण लॉकडाऊन असणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -