घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या आंदोलनात 12 कोटींचे नुकसान, पोलीस महासंचालकांची माहिती

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात 12 कोटींचे नुकसान, पोलीस महासंचालकांची माहिती

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांनी गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यातील विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आंदोलकांनी गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यातील विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजी नगर येथे मराठा आंदोलकांनी दोन दिवसांपासून हैदोस घातला आहे. तर काल पुण्यातील नवले पुल परिसरात मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या दोन दिवसांत राज्यात घडलेल्या हिंसाचाराची पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडून माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यातील 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. (12 crore loss in Maratha reservation movement, information of Director General of Police)

हेही वाचा – मराठा आणि धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाने राष्ट्रपतींची मागितली वेळ

- Advertisement -

यावेळी बोलताना पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले की, मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने शांततेत पार पडली आहेत. परंतु काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आंदोलकांकडून कायद्याचे उल्लंघन व काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही आरोपींना अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालकांकडून देण्यात आली आहे.

तसेच, आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांतील 307 कलमाखाली 7 गुन्हे दाखल आहेत. सध्या बीडमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर इंटरनेट सेवा ही बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालन्यामध्ये बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 141 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 168 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, 146 आरोपींना सीआरपीसी 41 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्यांना ते देण्यात आले आहे. आतापर्यंत 17 कंपनी एसआरपीएफ वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आली आहे. तसेच, रॅपिड अॅक्शन फोर्सची एक कंपनी बीडमध्ये दाखल झाली आहे. तर 7 हजार होमगार्डना तैनात करण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे तसेच जाळपोळ करणारे असामाजिक तत्त्व यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांकडून सहकार्य करण्यात येईल, परंतु पोलिलांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, कायद्याचे उल्लंघन करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेचे जाळपोळ करणारे लोकांवर पोलिसांनी आवश्यक ती कडक कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस महासंचालकांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -