घरताज्या घडामोडीNew Voters in Maharashtra 2022 : राज्यात १७ लाख नवीन मतदारांची वाढ,...

New Voters in Maharashtra 2022 : राज्यात १७ लाख नवीन मतदारांची वाढ, तर मुंबईत १ लाखांपेक्षा अधिक भर

Subscribe

राज्यात नुकत्याच पूर्ण झालेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात तब्बल १७ लाख नव्या मतदारांची भर पडली असून एकूण मतदारांच्या संख्येने ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आश्चर्य म्हणजे मुंबईत पुरुष आणि महिला मतदारांत तफावत वाढली असताना विदर्भ आणि कोकणातील तीन जिल्ह्यात मात्र महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.
मुंबईत ९९ लाख ६० हजार मतदार आहेत. त्यामध्ये यंदा १ लाख ७० हजार मतदार वाढले आहेत. मुंबईत ७४ लाख ५० हजार पुरुष मतदार असून २५ लाख महिला मतदार आहेत.

मुंबईत पुरुष आणि महिला मतदारांमध्ये मोठी तफावत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरु झालेला मतदार पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ रोजी संपला. याटी निधन आणि बोगस मतदार यांमुळे तब्बल ६३ हजार मतदार कमी झाले आहेत. मागच्या पुनरिक्षण कार्यक्रमात राज्यात ८ कोटी ९६ लाख मतदार होते. आता तो आकडा ९ कोटी १० लाख इतका झाला आहे. त्यामध्ये ४ कोटी ८० लाख पुरुष मतदार तर ४ कोटी ४० लाख महिला मतदार आहेत. तसेच ३ हजार ५२० तृतीयपयंथी मतदार आहेत.

- Advertisement -

राज्यातील तीन जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का वाढलेला आहे. गोंदियात ५ लाख ४० हजार पुरुष मतदार असून ५ लाख ५० हजार महिला मतदार आहेत. कोकणातील रत्नागिरीमध्ये ६ लाख ४० हजार पुरुष मतदार असून ६ लाख ९० हजार महिला मतदार आहेत. सिंधुदुर्गमध्ये ३ लाख ३५ हजार पुरुष टार ३ लाख ३७ हजार महिला मतदार आहेत.


हेही वाचा : मुंबईतील घाटकोपर–मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरील सामग्रीची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -