घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात लाखो रुपयांची बनावट दारु जप्त

सिंधुदुर्गात लाखो रुपयांची बनावट दारु जप्त

Subscribe

आंबोली बेळगाव येथे ३ लाख रुपयाची बनावट दारु जप्त करण्यात आली आहे. तर दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण १० लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आंबोली बेळगाव येथे लाखो रुपयांनी बनवाट दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ९२ हजार ७०० रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १० लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अवैध दारु वाहतूक प्रकरणी कार चालक सिताराम देवजी साठी (३७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


वाचा – दोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक

- Advertisement -

अशी जप्त करण्यात आली दारु

आंबोली मार्गे जिल्ह्यात गोवा बनावटीची दारु वाहतूक होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी रात्री आंबोली बेळगाव रस्त्यावर दानोली तिठा येथे अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला. मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास दानोली तिठा या ठिकणी एक स्विफ्ट व्हीआयजी कार येथून जात असताना या गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र ही गाडी न थांबता अधिक सुसाट पळू लागली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला संशय आला त्यांनी दानोली तिठा ते आंबोली पोलीस चेकपोस्ट असा १८ किमीचा थरारक पाटलाग करत गाडी चेकपोस्ट येथे रस्त्यावर आडवे उभे करुन कार थांबविण्यात आली. या गाडीची तपासणी केली असता या गाडीतून बनावट दारुची वाहतूक करत असल्याचे समोर आले. या गाडीमध्ये एकूण ४७ बनावट दारुचे बॉक्स एकावर एक रचण्यात आल्याचे आढळले. २ लाख ९२ हजार ७०० रुपयांच्या दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण १० लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, यू. एस. थोरात, जवान आर डी ठाकुर, एम.एस.पवार, एस. जी. मुपडे आणि एच आर वस्त या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -