घरमहाराष्ट्रपुण्यात पुरामुळे २८१ कोटींचे नुकसान; अभ्यासातून माहिती समोर

पुण्यात पुरामुळे २८१ कोटींचे नुकसान; अभ्यासातून माहिती समोर

Subscribe

आंबील ओढ्याला पूरपरिस्थितीचा अभ्यास करुन एका संस्थेने अहवाल तयार केला असून २८१ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने कामे करण्यासाठी ७७ कोटींचे कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर प्रायमुव्ह संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार काम करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. शहराच्या दक्षिण भागामध्ये कात्रज, आंबेगाव, कोंढवा गुजरवाडी, मांगडेवाडी, इत्यादी परिसरामध्ये २५ सप्टेंबरला अतिवृष्टी झाल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला. शहरातील अनेक भागात पाणी साचले. २८ नागरिकांना अतिवृष्टीमुळे प्राण गमवावे लागले होतो. यावेळी आंबील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले.

आंबील ओढ्याच्या उगमस्थानापासून नदीला मिळेपर्यंत प्रवाहाचा अभ्यास करणे, ओढ्यावर असणारे अतिक्रमणांचा अभ्यास करणे, प्रवाहाला अडथळा आणणारे घटक कोणते आहेत. अंबिल ओढ्याची रुंदी किती असावी, संरक्षण भिंत उभारणे याबाबातचा अभ्यास प्रायमुव्ह या संस्थेकडून करण्यात आला आहे. प्रायमुव्ह या संस्थेकडुन तयार करण्यास आलेला अहवाल महापालिका प्रशासनाला मिळालेला आहे. त्यानुसारच आता बांधकाम परवाणग्या देण्यात येत आहेत. या अहवालामध्ये शहरातील सर्व नाल्यांची माहिती देण्यात आली आहे. शहरात ज्या ठिकाणी पूर आला अशा भागांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये २८१ कोटी रुपयांचे नुकसना झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या जागेवर संरक्षक भिंत बांधणे, नाल्यांतील गाळ काढणे, प्रवाहाला अडथळे निर्माण अतिक्रमण काढण्यात येणार आहेत. यापुढे महापालिका प्रशासनाकडून ही कामे करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

नुकसान झालेल्या विविध ठिकाणी कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील अंदाजपत्रकामध्ये यासाठी तरतुद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तातडीने ७७ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या २०१९-२० च्या अंदाजपत्रकातील ८० कोटींची क अंदाजपत्रकातील तरतूद वापरण्यात येणार आहे. स्थायी समितीने याला मान्यता दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -