घरमुंबईपार्टी ड्रग्स या अंमली पदार्थांसह चौकडी अटकेत

पार्टी ड्रग्स या अंमली पदार्थांसह चौकडी अटकेत

Subscribe

ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पार्टी ड्रग्स अर्थात एलएसडी पेपर या लाखोंच्या अंमलीपदार्थसह चौकडीचा पर्दाफाश केला आहे. सलमान नवाब अली शेख (२८, रा.मुलुंड), संजीव उर्फ पॉल रामआग्या चौहान (२७, रा.नवीमुंबई), नितीन मारुती लामतुरे (३३, रा.नवीमुंबई) आणि सुशांत संभाजी रसाळ (३२, रा.कळबोली) अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सची नावे आहेत. या चौकडीतील रसाळ हा या ड्रग्ज तस्करीचा मास्टर माईंड असून सर्व आरोपींना ठाणे न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय आहे प्रकरण?

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी येऊर आणि उपवन परिसरात गस्त घालीत असताना १९ नोव्हेंबर रोजी कारमध्ये सलमान आणि चौहान या दोन व्यक्ती संशयास्पदरित्या आढळल्या. त्यांच्याकडे एमडी आणि एलएसडी पेपर असा २५ हजार रुपयांचा अंमलीपदार्थांचा साठा आढळला. त्यांच्या सखोल चौकशीत लामतुरे आणि रसाळ या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या. रसाळ याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला. यात डिझायनर ड्रग्ज म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या अंमली पदार्थाचे तब्बल १०९ पेपर या पेडलरकडे सापडले आहेत. त्याचबरोबर ५८ ग्रॅम एमडी पावडर, ६.४ ग्रॅम चरस आणि ९८ हजाराची रोकड असा एकूण ११ लाख ६१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांनी हे अंमलीपदार्थ कोणत्या पार्टीसाठी अथवा कुणाला विक्रीसाठी आणले होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -