घरक्राइमपरदेशातून आला 4 कोटींची लॉटरी लागल्याचा कॉल, 80 वर्षीय वृद्धा फसली अन्..

परदेशातून आला 4 कोटींची लॉटरी लागल्याचा कॉल, 80 वर्षीय वृद्धा फसली अन्..

Subscribe

नाशिक : ऑनलाइन पद्धतीने किंवा क्लोन कॉलच्या माध्यमातून डिजिटल ठग लूटमार करत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. बँकेतून बोलतोय तुमच्या बँक खात्याची माहिती द्या, अश्या पद्धतीचे बोलून लूटमार करण्याच्या घटना काही वर्षापासून घडत होत्या. मात्र, ही बाब आता सर्वश्रुत होत चालली आहे. यामुळे आता डिजिटल ठग नवनवीन आयडियाच्या कल्पना लढवून सामान्य नागरिकांना लुटण्याचा आपला गोरख धंदा चालवत आहेत. अश्यातच आता नाशिक मधील 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेला लॉटरीच्या नावाखाली लुटण्याची घटना घडली आहे.

पाथर्डी फाटा येथील ८० वर्षीय गर्ग यांना घरी असताना कॉल आला. तुमच्या पतीला परदेशातील रॉयल आर्यलॅण्ड बँकेकडून ४ कोटी ३८ लाखांची लॉटरी लागली आहे. ती रक्कम मिळविण्यासाठी ४ टक्के रक्कम भरावे लागतील. त्यानुसार वयोवृद्ध गर्ग यांनी अनोळखी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ४ लाख ३८ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना लॉटरीची रक्कम मिळाली नाही आणि अनोळखी व्यक्तीला कॉलही लागला नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

- Advertisement -

नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्ग यांच्या तक्रारीनुसार त्यांना ३ एप्रिल २०२३ रोजी इंटरनॅशनल नंबरहून इंटरनेट कॉल आला. अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी इंग्रजी भाषेत संवाद साधला. रॉयल बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या पतीला लॉटरी लागली असल्याचे अनोळखी व्यक्तीने त्यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गर्ग यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे ४ लाख ३८ हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांना कॉल बंद झाले आणि लॉटरीची रक्कमही मिळाली नाही. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सायबर पोलीस ठाण्यात गर्ग यांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी बँकव्यवहार थांबवण्यासाठी बँकेला ईमेल केला आहे. विशेष म्हणजे, संशयितांनी भारतातून कॉल करत परदेशातून कॉल केल्याचे भासवल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -