घरदेश-विदेशअरेच्चा, अमित शहांनी उल्लेख केलेल्या 'कलावती' महाराष्ट्रातील; राहुल गांधींनी घेतली होती 15 वर्षांआधी भेट

अरेच्चा, अमित शहांनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ महाराष्ट्रातील; राहुल गांधींनी घेतली होती 15 वर्षांआधी भेट

Subscribe

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशन वादळी ठरत असून, काल आणि आजचा दिवस सत्ताधारी विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनी चांगलाच गाजला. दरम्यान खासदारकी परत मिळालेल्या राहुल गांधी यांनी संसदेत आज मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारला मणिपूर हिंसाचारावरून चांगलेच धारेवर धरले होते. राहुल गांधी यांच्या भाषणाला उत्तर देताना अमित शहा यांनी राहुल गांधीवर चांगलाच हल्ला चढवला. त्यांनी 15 वर्षाआधी कलावती बांदूरकर यांच्या भेटीचा उल्लेख करीत त्यांचे पुढे काय झाले असा सवाल करीत राहुल गांधींवर टीका केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं 13 वेळा लाँचिंग झाले. आणि ते अयशस्वी ठरले अशी टीका अमित शाह यांनी केली.

- Advertisement -

बुंदेलखंडच्या नाही तर यवतमाळच्या आहेत कलावती

यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी ज्या महिलेच्या घरी गेले होते त्या कलावतीचे काय झाले असा सवाल केला. कलावतीला मोदी सरकारने सर्वकाही दिले असा दावा केला. अमित शाह यांनी कलावती बुंदेलखंडमधील असल्याचा उल्लेख केला. मात्र, कलावती बांदुरकर या महिलेच्या घरी राहुल गांधी गेले होते ती महिला बुंदेलखंडमधील नसून महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील जालका गावातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण होतं. राहुल गांधी यांनी २००८ मध्ये कलावती यांची भेट घेतली होती.

हेही वाचा : Pakistan : जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांची अवस्था वाईट; वकिलाला म्हणाले मला बाहेर काढा

- Advertisement -

राहुल गांधी यांनी मदत केल्याचा उल्लेख

राहुल गांधी यांनी मदत केल्याचे कलावती बांदूरकर यांनी मागील वर्षी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. राहुल गांधी भेटायला आले आणि त्यांनी गरिबी दूर केली, असे त्यांनी म्हटलं होते.

हेही वाचा : काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरींनी अमित शहांची तुलना केली ‘कोतवाला’शी, म्हणाले…

भारत जोडो यात्रेदरम्यान झाली होती पुन्हा भेट

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदूरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला. भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्यात कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आभार मानले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -