घरताज्या घडामोडीनाशकात चार नवीन कंटेन्मेंट झोन; सहा निर्बंधमुक्त

नाशकात चार नवीन कंटेन्मेंट झोन; सहा निर्बंधमुक्त

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून निम्याहून अधिक शहर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार शुक्रवारी चार दाट लोकवस्ती असणारे नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. नाईकवाडीपुरा, मोठा राजवाडा-वडाळानाका, शिवाजीवाडी-भारतनगर, राठी संकुल-पंचवटी ही चार नवे प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर, श्रीकृष्णनगर-सातपूर, हिरावाडी, बजरंगवाडी, पाटीलनगर-सिडको, जाधव संकुल-सातपूर, हनुमान चौक-सिडको येथे १४ दिवसांत बाधित नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे हे परिसर निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत.

एखाद्या परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला की, तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त, तसेच पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. यावर उपाय म्हणून रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित न करता रुग्ण राहतो ती इमारत कटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात आजवर 67 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी काही रुग्ण एकाच भागातील आहे. रुग्ण राहतात तो परिसर लक्षात घेत आजूबाजूचा ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत होते. आजवर शहरात ३७ हून अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमधील रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतरच परिसर निर्बंधमुक्त केला जात आहे. निर्बंधामुळे संबंधित परिसर निर्बंधमुक्त होईपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेकांना कंटेन्मेंट झोन परिसर कोठून सुरु होतो व कोठे संपतो, हे माहिती नसल्याने वाहनांवरुन अत्यावश्यक कारणास्तव घराबाहेर जाताना अडचण येत होती. नवीन निर्णयामुळे आता परिसर कंटन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार नाही. तर रुग्ण राहतो ती इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल. यामुळे पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या कर्मचार्‍यांवर येणारा ताण कमी होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ती इमारतीच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -