घरCORONA UPDATECorona: २४ तासांत १५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ५ जणांचा मृत्यू

Corona: २४ तासांत १५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोना संक्रमित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आकडा वाढून १४ हजार ७९२ वर

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत १४ हजार ७९२ कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सध्या २,७७२ अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण पोलीस

यामुळे कोरोना संक्रमित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आकडा वाढून १४ हजार ७९२ वर पोहोचला आहे. यापैकी सध्या २ हजार ७७२ अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण पोलीस असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १५३ झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची दिवसाला वाढ होत आहे. आजही १४,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,४७,९९५ झाली आहे. राज्यात आज १,८०,७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३३१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २३ हजार ७७५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

मृतांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

देशात दररोज ५० ते ६ हजरांच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर मृत्यूच्या आकडेवारीत देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ५५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.


काँग्रेसच्या खासदारांचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -