घरमनोरंजनमालिकांच्या सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव: 'या' मालिकेतील एका कलाकारासह ५ जण पॉझिटिव्ह

मालिकांच्या सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव: ‘या’ मालिकेतील एका कलाकारासह ५ जण पॉझिटिव्ह

Subscribe

स्वाती चिटणीस यांच्यासह मालिकेतील समीर ओंकार आणि सचिन त्यागी या प्रमुख कलाकारांसह चित्रीकरणातील क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण

राज्यभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र पुन्हा जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काही भागात अनलॉक केले गेले. या दरम्यान मनोरंजन विश्वात पूर्ण खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करून मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. खबरदारी, काळजी घेऊन देखील मालिकांच्या सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर कोरोनाचा संसर्ग झाला असून, यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांच्यासह पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

- Advertisement -

स्वाती चिटणीस यांच्यासह मालिकेतील समीर ओंकार आणि सचिन त्यागी या प्रमुख कलाकारांसह चित्रीकरणातील क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र या सर्व कलाकारांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं आढळली नाहीत. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती मालिकेच्या निर्मात्यांनी दिली आहे.

‘मी कोरोना पॉझिटिव्ह असून मी खूप वेगाने बरी होत आहे. मी वेळोवेळी माझ्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहे. आशा आहे की मी लवकरच परत येईल.’, असे स्वाती चिटणीस यांनी सांगितले तर सचिन त्यागी म्हणाले, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी घरी क्वारंटाईन आहे आणि आरोग्यविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन मी करीत आहे.’

- Advertisement -

दरम्यान, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘बा बहू और बेबी’, ‘खिचडी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून दिसलेला अभिनेता राजेश कुमारलाही कोरोनाची लागण झाले आहे. ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असून घरातच क्वारंटाइन झालो आहे’, असे त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.


Sushant Suicide Case: सुशांतचा केअर टेकर आणि रुममेट होणार माफीचे साक्षीदार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -